Home » Blog » Repo rate : रेपो दर कपातीने कर्जदारांना दिलासा

Repo rate : रेपो दर कपातीने कर्जदारांना दिलासा

सलग तीन महिन्यात दुसऱ्यांदा कपात

by प्रतिनिधी
0 comments
Repo rate

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिक पॉईंटसची कपात केली आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर कमी झाल्याने गृह, वाहन आणि वयक्तिक कर्जावरील व्याज दर कमी होणार आहेत. तसेच ठेवीवरील व्याजदर कमी होणार आहेत. एकीकडे रेपो दरात कपात केली असली तरी स्वयंपाकाचा गॅस, सीएनजीमध्ये वाढ झाल्याने त्याचा फटकाही मध्यमवर्गीयांना बसणार आहे. (Repo rate)

रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने रेपो दर २५ बेसिक पॉईंटसने कमी करुन सहा टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजात कपात होणार आहे. त्याचा फायदा कर्जदारांना होणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ सुरू केल्याने जागतिक बाजारपेठेत त्याचे पडसाद उमटले आहे. या पार्श्वभूमीवर सहा सदस्यीय एमपीसीने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणात करवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता असून जागतिक अर्थव्यवस्थेत घट होण्याची भिती असल्याने दर कपात करण्यात आली आहे. (Repo rate)

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, जगात आर्थिक घडामोडी वेगाने वाढत आहेत. या वर्षाची २०२५ ची सुरुवातच चिंताजनक झाली आहे. काही जागतिक व्यापार संघर्ष प्रत्यक्षात येत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये पाच वर्षानंतर प्रथमच रेपो दरात २५ बेसिक पॉईंटने कमी केले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आज रेपो दरात कपात झाली आहे. (Repo rate)

जानेवारी फेब्रुवारी या कालावधीत महागाई सरासरी ३.९ टक्के आहे. आरबीआयच्या जानेवारी फेब्रुवारी या कालावधीत महागाईचा दर ३.९ आहे. आरबीआयच्या जानेवारी मार्च २०२५ च्या तिमाही अंदाजापेक्षा ती कमी आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहित ग्राहक किंमत आधारित महागाई ४.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Repo rate)

रेपो दरात २५ बेसिक पॉईंटची कमात करुन सहा टक्के केल्याने कर्जाचे दर कमी होतील. हा निर्णय कर्जदारांना दिलासा ठरणार आहे. गृह आणि वैयक्तिक कर्जावरील त्यांचे समान मासिक हप्ते २५ बेसिक पॉईंटने कमी होतील. (Repo rate)

जागतिक व्यापार युद्धाचे पडसाद सर्वत्र पडत आहेत. भारतात दोन दिवसापूर्वी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. सीएनजी गॅस दरात वाढ केली आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. पुढील काळात अन्य वस्तूं आणि सेवा महाग होण्याची शक्यता आहे. (Repo rate)

हेही वाचा :

: ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00