Home » Blog » पाच राज्यांत धार्मिक दंगली, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

पाच राज्यांत धार्मिक दंगली, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

Religious Riots : मूर्तींची तोडफोड, जाळपोळ; यूपी, प. बंगाल, कर्नाटकातील घटना

by प्रतिनिधी
0 comments
Religious Riots

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच राज्यांत दुर्गापूजेवरून तसेच अन्य कारणांवरून वाद सुरू आहेत. दोन जमावांत दंगल उसळली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एक तरुण ठार झाला. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर आले. पोलिस आणि जमावाची बाचाबाची झाली. मूर्तींची तोडफोड, जाळपोळीसह अन्य अनेक अनुचित घटना घडल्या. (Religious Riots)

देशातील ५ राज्यांमध्ये धार्मिक वादावर आंदोलन सुरू आहे. तेलंगणातील हैदराबादमधील मुथ्यलम्मा मंदिरात सोमवारी सकाळी देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सकाळपासून येथे निदर्शने सुरू आहेत. भाजप नेत्या माधवी लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय मंत्री किशन रेड्डीही मंदिरात पोहोचले. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये रविवारी रात्री हावडा जिल्ह्यातील श्यामपूर भागात एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दुर्गा मंडपाची तोडफोड केली. समाजकंटकांनी दुर्गादेवीच्या मूर्तीलाही आग लावल्याचा आरोप भाजपने केला आहे. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील सोलापूर गावात रविवारी रात्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या अवमानावरून दोन गटांत हाणामारी झाली. तीन जण जखमी झाले. दोन दुचाकी आणि कारचे नुकसान झाले.

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गा विसर्जन दरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि दगडफेक झाली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. झारखंडमधील गढवा येथे रविवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी गावकरी आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. मूर्ती विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी वादग्रस्त रस्ता बॅरिकेड लावून बंद केला होता. हैदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील कुरमागुडा येथील मुथ्यालम्मा मंदिरात देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी ते म्हणाले, की आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने मंदिरात घुसून मातेची मूर्ती फोडली. हे लज्जास्पद आहे. काही लोकांनी त्याला पाहून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हैदराबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना सातत्याने घडत आहेत. काही लोक हे जाणूनबुजून हैदराबादमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी आणि जातीय दंगली वाढवण्यासाठी करत आहेत.  (Religious Riots)

‘सेंट्रल झोन’चे डीसीपी अक्षेश यादव म्हणाले की, तो माणूस भटका होता आणि त्याला भूक लागली होती. अन्नाच्या शोधात त्याने प्रसाद हलवला. त्यामुळे मूर्ती खराब झाली; मात्र भाजप नेत्यांनी याला षडयंत्र म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ‘सोशल मीडिया’वर म्हटले आहे की, श्यामपूरमधील दुर्गापूजा मंडपाची  तोडफोड करून मूर्तींना आग लावली आणि इतर मंडपाचीही तोडफोड केली. काहींनी विसर्जन घाटावर दगडफेकही केली. हावडा ग्रामीण पोलिस जिल्ह्यातील श्यामपूर पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील सोलापूर गावात १३ ऑक्टोबरच्या रात्री दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी दोन गटात हाणामारी झाली. तीन जण जखमी झाले. दोन दुचाकी आणि कारचे नुकसान झाले. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. एक दिवसापूर्वी महासी परिसरात दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी येथे हाणामारी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महासीच्या महाराजगंज भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Religious Riots)

१३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील हरदी भागात दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी डीजे वाजवण्यावरून दुसऱ्या समुदायाशी वाद झाला होता. या काळात हिंसाचार उसळला. झारखंडमधील गढवा येथे रविवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी गावकरी आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. मूर्ती विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वादग्रस्त मार्ग बंद केला होता; मात्र त्याच मार्गाने मूर्ती नेण्यावर ग्रामस्थ ठाम होते. ग्रामस्थ बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की पोलिसांना जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

तरुणाच्या मृत्यूनंतर जाळपोळ

दगडफेक आणि जाळपोळीसह २० हून अधिक गोळीबार करण्यात आला. यामध्ये २२ वर्षीय राम गोपाल मिश्रा यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सकाळी मृतदेह घरी पोहोचला, तेव्हा ५-६ हजारांचा जमाव जमला. मृतदेह घेऊन लोकांनी सुमारे पाच किलोमीटर प्रवास केला. पोलिसांनी समजावून सांगितल्यावर कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले; मात्र लोक तेथून हलले नाहीत. जमावाने जाळपोळ सुरू केली.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00