Home » Blog » RBI repo rate : आरबीआय’कडून रेपो दरात कपात

RBI repo rate : आरबीआय’कडून रेपो दरात कपात

तब्बल पाच वर्षानंतर घेतला निर्णय

by प्रतिनिधी
0 comments
RBI repo rate

नवी दिल्ली : आरबीआयच्या पतधोरण समिती (एमपीसी) च्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिक पॉईंटस् कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमपीसीने कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. या कपातीनंतर रेपो दर आता ६.२५ टक्क्यांवर आला आहे. पूर्वी तो ६.५ टक्के होता. गेल्या पाच वर्षातील ही पहिली कपात आहे. महागाई दरात घट आणि आर्थिक वाढीला पाठींबा देण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. (RBI repo rate)

२०२० मध्ये कोविड महामारीच्या प्रतिकूल आर्थिक परिणामांना तोंड देण्यासाठी २०२० मध्ये शेवटची रेपो दरात कपात जाहीर करण्यात आली होती. आरबीआय एमपीसी बैठकीला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासह सदस्य डॉ. नागेश कुमार, सौगत भट्टाचार्य, प्रो. राम सिंग, डॉ. राजीव रंजन आणि एम. राजेश्वर राव उपस्थित होते. सध्याच्या विकसित होत असलेल्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर एमपीसीने एकमताने निर्णय घेतला आहे. (RBI repo rate)

रेपो दर कमी का केला?

एमपीसीच्या निवेदनानुसार नाणेनिधीने चलनवाढीच्या दरात घट झाल्याचे म्हटले आहे. अन्नधान्याच्या किमतीचा अंदाज आणि मागील आर्थिक उपाययोजनांच्या परिणामांमुळे २०१५-२५ मध्ये आणखी घट अपेक्षित आहे. २०२४-२५  च्या दुसऱ्या तिमाहीच्या नीचांकी पातळीपेक्षा वाढ सुधारण्याचा अंदाज असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत ती लक्षणीयरित्या कमी असल्याचे समितीनेही मान्य केले आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे एमपीसीला वाटते की वाढीला चालना देण्याची ही संधी आहे. त्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने पॉलिसी रेपो दर २५ बेसिक पॉईंटने कमी करुन ६.२५ टक्के करण्यास सहमती दर्शवली आहे. (RBI repo rate)

आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठेतील वाढती अस्थिरता, जागतिक व्यापार धोरणांमध्ये सुरू असलेली अनिश्चितता, प्रतिकूल हवामान परिस्थिती चलनवाढीच्या शक्यतेवर आव्हान निर्माण करते हे समितीने मान्य केले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एमपीसीकडून सतत दक्षता घेण्याच्या आवश्यकतेवर एकमत झाले.

  हेही वाचा :

चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत
भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00