Home » Blog » Ranya Case : सोने तस्करीतील अभिनेत्रीचा ४५ वर देशांत प्रवास

Ranya Case : सोने तस्करीतील अभिनेत्रीचा ४५ वर देशांत प्रवास

२७ वेळा दुबई भेट; तस्करीत मोठे सिंडीकेट असल्याचा संशय

by प्रतिनिधी
0 comments
Ranya Case

बेंगळुरू : सोने तस्करीत सापडलेल्या अभिनेत्री रान्या रावच्या चौकशीत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिने २७ वेळा दुबईला भेट दिली. ४५ हून अधिक देशांत प्रवास केला आहे. त्यामुळे या तस्करीचे सिंडीकेट मोठे असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अभिनेत्री रान्या रावला बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर पकडले होते. तिच्याकडून १४ किलो सोने पकडले आहे. आर्थिक गुन्हेविषयक विशेष न्यायालयाने तिला तीन दिवसांची महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) कोठडी दिली. (Ranya Rao Case)

डीआरआयने तिचा पासपोर्ट ताब्यात घेतला आहे. त्यातील नोंदीनुसार ही माहिती उघड झाली आहे. “याशिवाय, अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. रान्याला कोण मदत करत आहे? ही तस्करी करणारी सिंडिकेट आहे का? हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. त्यामुळे आरोपीची सखोल चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत ९ मार्चपर्यंत तीन दिवसांसाठी कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. (Ranya Rao Case)

बेंगळुरूमधील तिच्या उच्चभ्रू लव्हेल रोड अपार्टमेंटवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी २.१ कोटी रुपयांचे डिझायनर सोन्याचे दागिने आणि २.७ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या रोकडसह मुद्देमालाची किंमत १७.३ कोटी झाली आहे.

सूत्रांनी सांगितले की हे दागिने एका प्रमुख राजकारण्याच्या निर्देशानुसार मिळवण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांनी कोणतेही नाव उघड केलेले नाही. अहवालात असे म्हटले आहे की हे दागिने शहरातील एका उच्च दर्जाच्या डिझायनर स्टोअरमधून आले होते. (Ranya Rao Case)

डीजीपी (कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची रान्या ही मुलगी आहे. ती सोने तस्करीत सहभागी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर तिच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

डीआरआयचे पथक सोमवारी (३ मार्च) संध्याकाळी ७ च्या सुमारास केम्पेगौडा विमानतळावर तैनात करण्यात आले होते. ती दाखल होताच तिला पकडण्यात आले. तिची तपासणी केली असता तिने बेल्टमध्ये सोन्याचे बार लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. (Ranya Rao Case)

४ मार्च रोजी तिला विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी तिला १८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

रात्री उशिरा डीआरआयने तिच्या कोठडीची विनंती न करता न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यामुळे जामीन देण्याची मागणी तिच्या वकिलांनी केली होती. तथापि, सोन्याचा स्रोत, पेमेंट पद्धती आणि मोठ्या सिंडीकेटशी तिचा संबंध असावा, त्यामुळे तिची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून डीआरआयने तिच्या सुटकेला जोरदार विरोध केला.

तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यापूर्वी रान्याची बोरिंग हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान, तिने दुबई दौरे व्यवसायासाठी होते, असा युक्तिवाद तिने केला. परंतु ती बेकायदेशीर तस्करीच्या कारवाईत सहभागी असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

हेही वाचा :

भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00