कोल्हापूर : रंगपंचमीचा उत्साह बुधवारी (१९ मार्च )सर्वत्र दिसून आला. अबालवृद्ध रंगात न्हाऊन गेले. अनेक शहरांत डीजेच्या तालावर तरुणाईने ताल धरला. रंगाची उधळण आणि जोडीला संगीताचा ठेका असे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. यंदा पहिल्यांदाच रंगपंचमीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आले होते. गल्लोगल्लीही साऊंड सिस्टमवर थिरकणारी तरूणाई दिसत होती. रंगपंचमीच्या या उत्साहाची छायाचित्रकार अर्जुन टाकळकर यांनी टिपलेली काही छायाचित्रे. (RANGPANCHAMI)

कोल्हापुरात गल्लोगल्ली सहकुटुंब रंगपंचमीचा आनंद लुटण्यात आला.

साने गुरुजी वसाहत येथे शारंगधर देशमुख यांनी आयोजित केलेल्या रंगोत्सवात डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या महिला व युवती

चेहरा रंगवलेले तरुण शहरभर फेरफटका मारताना दिसत होते.

काहिलीतील पालण्यात खेळताना लहान मुले.