नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे शिष्टमंडळ शनिवारी मणिपूरला गेले. ते हिंसाचारग्रस्त मणिपुरातील मदत छावण्यांना भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. न्यायाधीश मणिपूरला गेले, आता आपले पंतप्रधान कधी जाणार, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शनिवारी (२२मार्च) केला.( Ramesh criticized PM)
मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासूनच हिंसाचार सुरू आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या राज्याला भेट दिलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हिंसाचारग्रस्त राज्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भेट देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु पंतप्रधान कधी भेट देणार आहेत हा मोठा प्रश्न आहे?, असे ते म्हणाले. ( Ramesh criticized PM)
पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरला भेट दिली पाहिजे, असे आवाहन रमेश यांनी केले. ते म्हणाले, ‘‘बँकॉकला जाताना किंवा तिकडून येताना पंतप्रधान मणिपूरसाठी थोडा वेळ काढतील. पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा आहे.”
न्यायाधीश बीआर गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे शिष्टमंडळ शनिवारी हिंसाचारग्रस्त राज्यातील मदत छावण्यांना भेट देण्यासाठी मणिपूरच्या इम्फाळ येथे पोहोचले. ( Ramesh criticized PM)
मंत्र्यांनी न्यायाधीशांच्या भेटीचे स्वागत केले, परंतु राज्यात ‘संवैधानिक व्यवस्था कोसळली’ असूनही, राष्ट्रपती राजवट लागू करण्यात झालेल्या विलंबावर टीका केली.
‘मणिपूरला गेलेल्या सहा न्यायाधीशांचे आम्ही स्वागत करतो. पण प्रश्न असा येतो की, १ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयानेच मणिपूरमधील संवैधानिक व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचे सांगितल्यानंतरही, राष्ट्रपती राजवट लागू करण्यास १८ महिने का लागले?’ असे ते म्हणाले.
संसदेत गृह मंत्रालयाच्या कामकाजाबाबतच्या चर्चेदरम्यान मणिपूरमधील परिस्थितीकडे लक्ष न दिल्याबद्दल रमेश यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. ‘काल (शुक्रवारी), गृहमंत्र्यांनी राज्यसभेत त्यांच्या मंत्रालयाच्या कामकाजाबद्दल सुमारे चार तास उत्तर दिले, परंतु त्यांनी मणिपूरबद्दल फारसे काही सांगितले नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ( Ramesh criticized PM) शहा यांच्यावर त्यांनी मणिपूरला न जाता मिझोरामला भेट दिल्याबद्दलही टीका केली. ‘गृहमंत्री मिझोरामला जातात, ते मणिपूरला का गेले नाहीत? आणि अमेरिकेला गेल्यानंतर मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात,’ असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
विनोद कुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ जाहीर
आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम