कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप.बँकेच्या चेअरमनपदी नवोदितादेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी उमेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या प्रधान कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. समीर जांबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. त्यात ही निवड झाली. पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या राजे बँकेची सलग पाचवी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे.(Raje Bank)
चेअरमनपदासाठी सौ.नवोदिता घाटगे यांचे नाव एम. पी.पाटील यांनी सूचवले. नम्रता कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी उमेश सावंत यांना रवी घोरपडे सुचक तर अरुण गुरव यांनी अनुमोदन दिले.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी अध्यक्ष तथा संचालक एम्. पी. पाटील यांचे हस्ते झाला. बँकेचे मार्गदर्शक व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. समीर जांबोटकर व माजी अध्यक्ष तथा संचालक एम्. पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.(Raje Bank)
समरजितसिंह घाटगे व नूतन चेअरमन नवोदितादेवी घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँकेचे संचालक रवींद्र घोरपडे, रणजित पाटील, दत्तात्रय खराडे, दीपक मगर, संजय पाटील, प्रकाश पाटील, अरूण गुरव, संजय चौगुले, राघू हजारे, प्रविण कुऱ्हाडे वड्ड, अमर चौगले, अमोल शिवई, सुशांत कालेकर, संचालिका नम्रता कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण पाटील, जनरल मॅनेजर हरिदास भोसले व बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(Raje Bank)
एम. पी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी आभार मानले
शाहू ग्रुपकडून असाही महिला सन्मान
शाहू साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यानंतर आता राजे बँकेच्या चेअरमनपदी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांची निवड झाली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपकडून शाहू साखर कारखान्यानंतर राजे बँकेची धुरा नवोदितादेवी घाटगे यांच्याकडे सोपवण्यात आली.
हेही वाचा :
सौर प्रकल्पातून ५२४९ शेतकऱ्यांना दिवसा वीज
महाकुंभमध्ये नावाड्याने कमावले ३० कोटी