कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्या गोष्टीत आपल्याला आत्मविश्वास असेल व भविष्य दिसत असेल त्या आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा, असा सल्ला अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू राही सरनोबत यांनी विद्यार्थ्यांना दिला. नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव विश्वनाथ मगदूम हे होते. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये यश मिळविलेल्या सुमारे दीडशे विद्यार्थांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. (Rahi Sarnobat)
राही सरनोबत म्हणाल्या. ‘प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गोष्ट ठरवली पाहिजे की ज्यासाठी आपण अपार कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सतत शोधत राहिले पाहिजे, तरच आपण यश व नावलौकिक मिळवू शकतो. आमच्या घरात नेमबाजीची कसलीही पार्श्वभूमी नव्हती. एका सामान्य कुटुंबातून मी आले. परंतु नेमबाजीने मला आत्मविश्वास दिला. गेल्या वीस वर्षात मी कोणत्याही स्पर्धेला एक मिनिटही उशीर केला नाही . खेळाला मी सर्वोच्च प्राधान्य दिले . सतत नवं शिकत राहिले . वाचन करीत राहते. ते पुढं कधीही उपयोगी पडू शकते. (Rahi Sarnobat)
ज्या गोष्टीत आपल्याला आत्मविश्वास असेल व भविष्य दिसत असेल ते आपण केले पाहिजे. स्वत:वर विश्वास असेल व अन्य कोणाचाही विश्वास नसेल तरी तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा ‘, असे आवाहन अर्जुन पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय ऑलिंपियन नेमबाज राही सरनोबत यांनी केले . (Rahi Sarnobat)
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ . विश्वनाथ मगदूम म्हणाले की, नाइट कॉलेजने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दजेदार शिक्षण देऊन सामाजिक परिवर्तनाचे मोठे काम केले आहे . कॉलेजमधील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची योजना संस्थेमार्फत सुरू केले जाईल. (Rahi Sarnobat)
प्राचार्य प्रा .डॉ . उत्तम पाटील यांनी कॉलेजच्या वाटचालीचा व प्रगतीचा आढावा घेतला . जिमखाना प्रमुख डॉ .एस जे फराकटे यांनी अहवाल वाचन केले . यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये यश मिळविलेल्या सुमारे दीडशे विद्यार्थांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिकांची यादी वाचन डॉ महेंद्र जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा सुमन कांबळे व आभारप्रदर्शन डॉ एस पी सूर्यवंशी यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (Rahi Sarnobat)
हेही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज व्हा