Home » Blog » रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

निवृत्तीच्‍या घोषणेमुळे चाहत्‍यांना धक्‍का

by प्रतिनिधी
0 comments
R Ashwin

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने ही घोषणा केली. अश्विन कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत आला. तिथे त्याने ही घोषणा केली. निवृत्तीपूर्वी अश्विन ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीसोबत बसलेला दिसला होता.  (R Ashwin)

अश्विनच्या नावावर अनेक विक्रम

रविचंद्रन अश्विनने आपल्या जादूई फिररीने अनेक विक्रम रचले आहेत. कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. अश्विनने १०६ कसोटीत ५३७ विकेट घेतल्या आहेत. ५९ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या काळात त्याची सरासरी २४.०० होती. तर, स्ट्राइक रेट ५०.७३ इतका होता. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर ६१९ कसोटी विकेट्स आहेत.

सर्वाधिक वेळा पाच बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन संयुक्त दुसरा

अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३७ वेळा फाईव्ह विकेट हॉल केला आहे. तो या यादीत संयुक्तपणे शेन वॉर्न दुसऱ्या क्रमाकांवर आहे. यादीत पहिल्यास्थानी अव्वलस्थानी श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने ६७ वेळा फाईव्ह विकेट हॉल घेतला आहे. (R Ashwin)

अश्विनची फलंदाजीतही उत्तम

उत्तम फिरकीपटू असण्यासोबतचा अश्विन उत्तम फलंदाज आहे. त्याने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी बॅटने चांगली कामगिरी केली आहे. अश्विने १०६ कसोटी, ११६ वन-डे आणि ६५ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

अश्विनने कसोटीत ३५०३ धावा आहेत. या काळात त्याची सरासरी २५.७५ इतकी आहे. अश्विनची १२४ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. फलंदाजीत त्याने त्याने ६ शतके आणि १४ अर्धशतके झळकवली आहेत. अश्विनने वनडेमध्ये १५६ आणि टी-२०मध्ये ७२ विकेट घेतल्या आहेत. वन-डेमध्ये २५ धावांत ४ विकेट आणि टी-२० मध्ये ८ धावांत ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईकडून खेळणार

अश्विनने ५ जून २०१० ला हरारे येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर टी-२० मध्ये त्याने १२ जून २०१० ला हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध पदार्पण केले. अश्विनचे ​​कसोटी पदार्पण २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत केले होते. कसोटीत सर्वाधिक प्लेयर ऑफ द सिरिज त्याने पटकावले आहेत. त्याने कसोटीत ११ वेळा प्लेयर ऑफ द सिरिजचा पुरस्कार पटकावला आहे. या बाबतीत तो मुरलीधरनच्या बरोबरीने आहे. अश्विन २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने त्याचा आपल्या संघात समावेश केला आहे. (R Ashwin)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00