Home » Blog » Quake survivors rescue: ६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले

Quake survivors rescue: ६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले

बचावपथकाने केली सुटका, म्यानमारमध्ये बचावकार्य अद्याप सुरूच

by प्रतिनिधी
0 comments
Quake survivors rescue

नेपिडो : त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. प्रचंड ढिगाऱ्याखाली त्यांनी साठ तास कसे काढले असतील, हे एक आश्चर्यच, पण चौघांची बचावपथकाने सुखरूप सुटका केली. ढिगारे उपसण्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्याचे काम भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये अद्याप सुरूच आहे.(Quake survivors rescue)

शुक्रवारी (२८ मार्च) म्यानमार आणि थायलंडला भूकंपाचा जोराचा धक्का बसला. त्याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या तडाख्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यात आतापर्यंत किमान १,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर सागाईंग प्रदेशातील एका कोसळलेल्या शाळेच्या इमारतीतून काहीजणांना वाचवण्यात आले. येथे एक मृतदेहही सापडल्याचे म्यानमारच्या अग्निशमन विभागाने सांगितले.(Quake survivors rescue)

म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये सोमवारीही शोध आणि बचाव कार्य सुरू असून शेकडो लोक बेपत्ता आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. तेथे बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली. तिच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले ७६ कामगार अजूनही बेपत्ता आहेत.

मंडाले हे म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर आहे. येथील सागाईंग फॉल्टजवळ भूकंप झाला. त्याचे धक्के शेजारील इतर अनेक देशांनाही बसले. (Quake survivors rescue)

दळणवळण कोलमडले; मदत पोहोचण्यात अडथळे

शुक्रवारपासून बचावकार्य सुरू आहे. म्यानमारकडे आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र दळणवळणावर विपरीत परिणाम झाल्यामुळे सर्वांत जास्त हानी झालेल्या भागात मदत पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे  स्थानिकांना हाताने ढिगारे उपसावे लागत आहे. जीवंत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रुग्णालये जखमींनी भरलेली आहेत, असे सांगितले. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले आहे की हजारो विस्थापित लोक अन्न, निवारा आणि औषधांशिवाय आहेत.

मंडाले येथील एका शिक्षिकेने सांगितले की शहरात मदत पोहोचली आहे की नाही याची खात्री नाही. “अधिकारी सांगतात की बचावकार्य येत आहे, परंतु लोक अजूनही त्रास सहन करत आहेत,” असे तिने सांगितले. (Quake survivors rescue)

जवळच्या सागाईंग शहरासह अनेक भागात मृतदेहांची दुर्गंधी पसरत आहे.

वृद्धेचा ३६ तास संघर्ष

शनिवारी रात्री, म्यानमारची राजधानी नेपिडो येथे एका वृद्ध महिलेला रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून वाचवण्यात आले. ३६ तास तिचा संघर्ष यशस्वी ठरला. तिला बचावपथकातील कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी दाखल केले. स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, मंडाले येथील एका कोसळलेल्या अपार्टमेंट ब्लॉकमधून २९ जणांना वाचवण्यात आले.

हेही वाचा :
रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00