हैदराबाद : प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा ॲक्शन ड्रामा असलेल्या ‘पुष्पा’ने १५०० कोटीची एकत्रित कमाई केली. या दोन्ही भागामुळे पुष्पा अक्षरश: मालामाल होत आहे. मात्र त्याची कथा ज्यावर आधारीत आहे त्या रक्तचंदनाला मात्र राज्यात उठाव नसल्याचे चित्र आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या ताब्यात असलेल्या रक्तचंदनाच्या साठ्याचा लिलाव अनेकदा जाहीर करण्यात आले. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. (Pushpa)
सिनेमात रक्तचंदनाची होणारी तस्करी आणि त्यातून घडणारे नाट्य दाखवले. सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई झाली. म्हणजे दोन्ही भागाची एकत्रित कमाई १५०० कोटीवर गेली आहे. तथापि, आंध्र प्रदेश सरकार मात्र रक्तचंदनाच्या अधिकृत लिलावातून नफा मिळविण्यासाठी अजूनही धडपड असल्याचे वास्तव आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून त्यासाठी कुणी फारसा रस दाखवेनासे झाले आहे. (Pushpa)
लाल चंदन हे लुप्तप्राय प्रजाती म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेने सूचीबद्ध केले आहे. त्यामुळे त्याची तोडणी किंवा विक्री बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. मात्र मर्यादित कायदेशीर विक्रीला परवानगी देऊन, संकटग्रस्त यादीतून प्रजाती काढून टाकण्याची परवानगी भारताला मिळाली आहे.
रक्तचंदन रायलसीमा प्रदेशात मिळते. काही पारंपरिक औषधांमध्ये त्याचा वापर केला जाते. तसेच लक्झरी वस्तू उद्योगांमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. आंध्र प्रदेश सरकार त्याचा लिलाव करते. परंतु, कोविड महामारीपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक टनही विकले गेले नाही.
दरम्यान, भारतातील सर्वांत श्रीमंत जैवक्षेत्रांपैकी एक असलेले राज्यातील शेषाचलम हिल्स रक्तचंदनाच्या तस्करीचे केंद्र बनले आहे. (Pushpa)
एपी सरकारमधील सूत्रांनी असे स्पष्ट केले की, कोविड-१९ साथीच्या काळापासून, कोणत्याही आंतरराष्ट्रीय लिलावात लाल चंदन विकले गेले नाही. विशेष म्हणजे या लाकडासाठी सर्वाधिक रस दाखवणाऱ्या चीननेही यात फारसा रस दाखवलेला नाही.
परकीय व्यापार महासंचालनालयाने आंध्र पदेशला ११,००० टन रक्तचंदन लिलाव करण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी सुमारे ४,००० टन अजूनही तिरुपती मंदिरातील डेपोमध्ये अत्यत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
१९९० च्या दशकापासून, आंध्र सरकारने आंतरराष्ट्रीय लिलावाच्या जवळपास २४ फेऱ्या केल्या. परंतु केवळ ₹१,८०० आणि ₹१,९०० कोटी इतकीच रक्कम मिळाली आहे. ‘पुष्पा’च्या कमाईपेक्षा ती किंचित जास्त आहे.
हेही वाचा :
- हरपवडे ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेले वानर अखेर पिंजऱ्यात बंद
- जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला
- सर्व विभागांनी १०० दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी