नवी दिल्ली : UI (2024) Box Office Collection : “यूआई” या २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपटाने केवळ दोन दिवसांतच पुष्पा २ च्या १७ दिवसांच्या उत्पन्नाच्या दुप्पट कमाई केली आहे. अल्लू अर्जुनचा पॅन इंडिया सिनेमा “पुष्पा २” हिंदी भाषेत सुपर हिट ठरला असली, तरी कन्नड भाषेत तो तितकासा यशस्वी झाला नाही. मात्र, “यूआई” ने दोन दिवसांत जोरदार प्रदर्शन करून बाजी मारली आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, “यूआई” ने पहिल्या दिवशी ६.९५ कोटींची ओपनिंग केली. त्यात कन्नडमध्ये ६.२५ कोटी, तेलुगूमध्ये ६५ लाख, तमिळमध्ये ४लाख, तर हिंदीत एक लाख इतकी कमाई झाली. दुसऱ्या दिवशी हा आकडा साडेसहा कोटी ते सात कोटींच्या दरम्यान होता, ज्यामुळे भारतातील एकूण कलेक्शन १३.९० कोटींपर्यंत पोहोचले. तुलनेत, “पुष्पा २” ने कन्नड भाषेत १७ दिवसांत केवळ ७.२४ कोटींची कमाई केली होती.
“UI ” हा कन्नड भाषेतील सायन्स फिक्शन अॅक्शन चित्रपट आहे. त्याचे लेखन व दिग्दर्शन अभिनेता उपेंद्र यांनी केले आहे. यात रेशमा ननैय्या, निधी सुब्बैया, साधु कोकिला, मुरली कृष्ण, मुरली शर्मा आणि इंद्रजीत लंकेश असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाबाबत प्रदर्शनानंतर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मात्र, “यूआई” चे ओपनिंग कलेक्शन अभिनेता उपेंद्रच्या आधीच्या “कब्जा” चित्रपटाच्या च्या 10 कोटींच्या कलेक्शनपेक्षा कमी आहे.
हेही वाचा :
- उद्धव-राज ठाकरे एकत्र
- पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित
- अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले