Home » Blog » Pune Bus Rape: स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा शोध ड्रोनच्या सहाय्याने

Pune Bus Rape: स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा शोध ड्रोनच्या सहाय्याने

गाडेची माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षीस; शोधासाठी तेरा पथके

by प्रतिनिधी
0 comments
Pune Bus Rape

पुणे : प्रतिनिधी : येथील स्वारगेट बसस्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील संशयित दत्तात्रय रामदास गाडे (रा. गुणात, ता. शिरुर) याची माहिती देणाऱ्यास रोख रुपये एक लाखाचे बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच गाडेचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. आरोपीच्या शोधासाठी ड्रोन आणि श्वानपथके कार्यरत केली आहेत.(Pune Bus Rape)

दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तेरा पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. या पथकांमपैकी आठ पथके गुन्हे शाखेची तर पाच पुणे पोलिसांची आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, आरोपीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. लोकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गुरुवारी (२७ फेब्रुवारी) आरोपी गाडेच्या गुणात या मूळगावी मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाले. तेथे अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. तो उसाच्या शेतात लपून बसला असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील ऊस शेतीतही शोध घेतला. (Pune Bus Rape)

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट स्थानकात झालेल्या या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक परिवहन अधीक्षक आणि बस डेपो मॅनेजर या दोघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास निलंबनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महामंडळाने या आगारातील सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी पहाटे सातारा येथील गावी जाण्यासाठी स्वारगेट स्थानकात आलेल्या महिलेवर आरोपी गाडे याने अत्याचार केला. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी गृहखात्यावर टीकेचे झोड उठवली. त्यानंतर पोलीस आणि एसटी महामंडळही खडबडून जागे झाले आहे.(Pune Bus Rape) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकार लाजिरवाणा, वेदनादायक आणि संतापजनक असल्याचे म्हटले आहे. संबंधितावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. तसेच या प्रकरणात कायदेशीर कार्यवाही जलदगतीने करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

पाच नातलगांना पाठोपाठ संपवले

मैतेईच्या टेंगोल गटाने शस्त्रे टाकली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00