कोल्हापूर : प्रतिनिधी : यजमान पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत संध्यामठ तरुण मंडळाचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या ऋषिकेश मेथेने शानदार हॅटट्रीक साजरी केली. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे.
आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पाटाकडील संघाचे वर्चस्व होते. सामन्याच्या सातव्या मिनिटाला ओंकार मोरेने मैदानी गोल करत संघाचे खाते खोलले. त्यानंतर ऋषिकेश मेथेचा धडाका सुरू झाला. २४ व्या मिनिटाला ऋषिकेशने पहिला गोल केला. ३२ आणि ३६ व्या मिनिटाला सलग दोन करत ऋषिकेशने शानदान हॅटट्रीक साजरी केली. मध्यंत्तरास पाटाकडील संघाने ४-० अशी घसघशीत आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातील खेळावरही पाटाकडीलची छाप होती. संध्यामठचा प्रतिकार तोकडा पडला होता. ७४ व्या मिनिटाला ओंकार पाटीलने संघाच्या पाचव्या गोलची नोंद केली. पूर्णवेळेत ५-० अशी आघाडी कायम टिकवत पाटाकडीलने सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. संध्यामठकडून कपिल शिंदे, सिद्धेश काळे, श्रेयस कोळेकर, यशराज जांभळे, देवराज जाधव यांचा चांगला खेळ झाला. हॅट्ट्रीक करणाऱ्या ऋषिकेश मेथेची सामनावीर म्हणून निवड झाली.
मंगळवारचा सामना : खंडोबा तालीम मंडळ वि. वेताळमाळ तालीम मंडळ, दुपारी ४.००वा.
हेही वाचा :
हॅरी ब्रुकची दुसऱ्यांदा ‘आयपीएल’मधून माघार