कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शने करणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिल्याप्रकरणी कोरटकर आणि केशव वैद्य यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. (Protests against CM)
प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्य यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना अडवून जाब विचारणार असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी (६ मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते पन्हाळा येथे लाईट, साऊंड शोचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी ते नागाळा पार्क येथील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी येणार होते.
नागाळा पार्क येथील खानविलकर बंगला येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नेतेमंडळींनी केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी (५ मार्च) रात्रीपासून पोलिसांनी प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, माजी महापौर आर. के. पोवार, प्रविण पाटील, हर्षल सुर्वे, प्रविण पाटील, अर्बन बँकेचे संचालक संभाजी जगदाळे, शुभम शिरहट्टी, रवी जाधव, कॉ. चंद्रकांत यादव यांच्यासह ५० जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. (Protests against CM)
गुरुवारी सायंकाळी खानविलकर बंगल्याजवळ शिवप्रेमी जमू लागले. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. राज्य सरकारच्या विरोधात शिवप्रेमींनी घोषणा दिल्या. प्रशांत कोरटकरच्या निषेधार्थ घोषणा देऊन कोरटकरला अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या. पण पोलिसांनी मुख्यमंत्री फडणवीस नागाळा पार्कात येण्यापूर्वी आंदोलकांना बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर काहीकाळ परिसरात तणाव होता. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरळीत झाला. (Protests against CM)
हेही वाचा :
भय्याजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
‘जलसंपदा’चा कारभार मोहित कंबोजकडून सुरू