महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमान पद पाकिस्तानकडे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेलला मान्याता दिल्यामुळे स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान आयसीसीने पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक टीम पाकिस्तानला पाठवली आहे. यासह न्यूझीलंड क्रिकेटने जानेवारीत होणाऱ्या त्रिकोणी मालिकेपूर्वी सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक टीम पाकिस्तानमध्ये पाठवली आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघात त्रिकोणी मालिका होणार आहे. (ICC Champions Trophy)
त्रिकोणी मालिकेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेटने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक टीम पाकिस्तानला पाठवली आहे. न्यूझीलंडच्या तुकडीमध्ये सुरक्षा तज्ञ रेग डिकासन आणि न्यूझीलंड खेळाडू संघटनेचे प्रतिनिधी ब्रॅड रॉडेन यांचा समावेश आहे. ते कराची आणि लाहोरमधील सुरक्षा व्यवस्था आणि इतर तयारींचा आढावा घेणार आहेत.
भारत-पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी
आयसीसीने सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आयसीसीने गुरुवारी (दि.१९) याची अधिकृत घोषणा केली. आयसीसीच्या माहितीनुसार पुढील वर्षी म्हणजे २०२५ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. (ICC Champions Trophy)
आयसीसीच्या टीमने घेतला आढावा
पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आढावा घेण्यासाठी आयसीसीने एक टीम पाकिस्तानमध्ये पाठवली आहे. आयसीसी टीमने लाहोर आणि रावळपिंडीला जाण्यापूर्वी कराचीतील नॅशनल स्टेडियमला भेट दिली. यावर बोलताना पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा दौरा कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी होतो. न्यूझीलंड आणि आयसीसी संघांनी कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.
JUST IN: ICC issues update on Champions Trophy 2025 venue.
Details 👇https://t.co/aWEFiF5qeS
— ICC (@ICC) December 19, 2024
हेही वाचा :
- चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला सरप्राईज
- India U-19 : भारतीय मुलींचा संघ अंतिम फेरीत
- जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धा दिल्लीत