Home » Blog » preganancy dignosis : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह तिघींना अटक

preganancy dignosis : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह तिघींना अटक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रॅकेट आणले उघडकीस

by प्रतिनिधी
0 comments
preganancy dignosis

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळ असलेल्या कळंबा येथे गर्भपात करणारे रॅकेट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उघडकीस आणले. गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरसह गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या दोघां महिलांनाही ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात दोन महिन्यात दोन कारवाया झाल्याने गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.(preganancy dignosis)
श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉ. दीपाली सुभाष ताईगडे (वय ४६, रा. साई मंदिरासमोर, कळंबा), सुप्रिया संतोष माने (४२, रा. रायगड कॉलनी, कळंबा) आणि धनश्री अरुण भोसले (३०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) या तिघांना अटक केली आहे. खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भिकाजी देशमुख आणि करवीर तालुका आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी फिर्याद दिली आहे.(preganancy dignosis)
करवीर पोलिसांनी कारवाईची माहिती दिली. शहरानजिक असलेल्या कळंबा गावातील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बुधवारी करवीर पोलिसांच्या मदतीने डमी रुग्णाच्या माध्यमातून सापळा रचला. गर्भवती असलेल्या एका महिलेला डॉ. दीपाली ताईगडे यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉ. ताईगडे यांनी रुग्णाची तपासणी करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. तसेच काही वेळात गर्भलिंग तपासणीसाठी एक व्यक्ती मशीन घेऊन येईल असे सांगितले. अवैध प्रकार सुरू असल्याची खात्री पटताच आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.(preganancy dignosis)
या कारवाईत हॉस्पिटलमधून गर्भपाताच्या गोळ्यांची तीन पाकिटे जप्त केली. दिवसभर झडती घेऊन हॉस्पिटल सील करण्यात आले. डॉ. ताईगडे यांच्या दोन सहकारी असलेल्या महिलांनाही ताब्यात घेण्यात आले. करवीर तालुक्यातील पाडळी येथील डमी महिलेने सुप्रिया माने आणि धनश्री भोसले यांना फोन करुन वरणगे पाडळी येथे बोलावून घेतले. त्यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यावर दोघींवर कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यादेखील कारवाईदरम्यान उपस्थित होत्या. पोलिस उपनिरीक्षक स्नेहल टकले अधिक तपास करीत आहेत.

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00