Home » Blog » Prayagraj story : सुहागरात्रीच वधूचा मुलाला जन्म, पतीची झोप उडाली

Prayagraj story : सुहागरात्रीच वधूचा मुलाला जन्म, पतीची झोप उडाली

वधूची बाळासह माहेरी रवानगी

by प्रतिनिधी
0 comments
Prayagraj story

प्रयागराज : प्रतिनिधी : उत्तरप्रदेशातील एका घटनेने चांगलीच खळबळ उडाली. सुहागरात्रीलाच वधूने एका मुलाला जन्म दिला. या घटनेने पतीची झोप उडाली असून त्यांचे नातेवाईक चक्रावून गेले. प्रयागराज जिल्ह्यातील करछना क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली. या घटनेची प्रयागराज जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तरप्रदेशात चर्चेचा विषय बनला आहे. (Prayagraj story)

प्रयागराज जिल्ह्यातील करछना क्षेत्रातील एका गावात २४ फेब्रुवारीला वरात आली. सासरच्या मंडळींनी वराचे जंगी स्वागत केले. त्यानंतर विवाहाचे सर्व विधी धुमधडाक्यात झाले. त्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी वधूची बिदाई करण्यात आली. सासरी आल्यावर वधूने रितीरिवाजानुसार गृहप्रवेश केला आणि सर्व विधी केले. २५ फेब्रुवारीला सुहागरात्रीच्या दिवशी वधूच्या पोटात दुखू लागले. सासरच्या मंडळींनी सुनेवर घरगुती उपचार करुन पोटदुखी बंद होण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण त्याचा फायदा झाला नाही. वधूची पोटदुखी वाढतच गेली. पोटदुखी जास्तच वाढल्याने रात्रीतच वधूच्या पती आणि नणंदेने तिला एका प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर पोटदुखीचे कारण ऐकून पती आणि नातेवाईकांचे डोके गरगरुन गेले. (Prayagraj story)

वधूला पाठवले माहेरी

वर आणि नातेवाईकांनी डॉक्टरांनी वधू नऊ महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या पोटात दुखत आहे. थोड्या वेळ्यात तिची डिलिव्हरी होणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी ही गोष्ट सांगताच सासरच्या लोकांच्या पायखालची वाळू सरकली. त्यांनी वधूच्या घरी फोन करुन त्यांना बोलावून घेतले. थोड्यावेळाने वधूने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर २६ फेब्रुवारीला वराने वधूला नवजात बाळांसह नातेवाईकांसमवेत त्यांना माहेरी पाठवून दिले. (Prayagraj story)

हा मुलगा पतीचाच, माहेरच्यांचा दावा

लग्नानंतर चोवीस तासात वधू आई बनल्याने परिस्थिती गंभीर झाली. वधूच्या नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की मे २०२४ मध्ये विवाह ठरला होता. त्यानंतर वधू आणि वर फोनवर सतत बोलत असत. तसेच दोघे बाहेर भेटत असत. जो मुलगा जन्माला आला आहे हा नवऱ्या मुलग्याचा आहे. पण वर हे मानायला तयार नाही. वराच्या घरच्यांनी सुन म्हणून वधूला नकार दिला आहे. या घटनेनंतर पंचायत बोलावण्यात आला आहे. पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पंचायतेमध्ये निर्णय झालेला नाही. पण या घटनेची संपूर्ण उत्तर पदेशात चर्चा सुरू आहे. (Prayagraj story)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00