Home » Blog » Pratik Priya wedding : प्रतीक-प्रिया लग्नबंधनात

Pratik Priya wedding : प्रतीक-प्रिया लग्नबंधनात

स्मिता पाटील यांच्या घरी रंगला सोहळा

by प्रतिनिधी
0 comments
Pratik Priya wedding

मुंबई : अभिनेता प्रतीक बब्बरने प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. प्रतीकच्या आई, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरी अत्यंत कौटुंबिक वातावरणात हा समारंभ पार पडला. (Pratik Priya wedding )

प्रतीक आणि प्रिया दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होते. आता लग्न करून त्यांनी आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील या जिव्हाळ्याच्या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

अनेक प्रतिमांपैकी एका फोटोत प्रतीक भावूक झालेला दिसत आहे. तो स्मिता पाटील यांच्या प्रतिमेसमोर बसल्याचे दिसते. (Pratik Priya wedding )

त्यांच्या या खास दिवसासाठी, प्रतीक आणि प्रियाने तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केलेले उत्कृष्ट पारंपरिक पोशाख निवडले. हस्तिदंती आणि सोनेरी लेहेंग्यात प्रिया खूपच उठून दिसत होती. नाजूक धागे आणि भरतकाम असलेला हा पोशाख भारतीय कारागिरीची श्रीमंती दाखवतो.

समारंभातील सजावटही साधी मात्र उंची होती. हस्तिदंती आणि पांढरे रंग मूडवर वर्चस्व गाजवत होते. त्यांच्या लग्नाचा मंडपही ताज्या पांढऱ्या फुलांनी आणि हिरव्या पर्णसंभाराने सजला होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या स्वप्नाळू सौंदर्यात आणखी भरच घातली.(Pratik Priya wedding )

प्रतीकचे हे दुसरे लग्न आहे. सान्या सागरसोबत आधी त्याचे लग्न झाले होते. मात्र ते अवघ्या वर्षभरातच ते वेगळे झाले. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.

हेही वाचा :

बोराडे नावाचे साहित्य शिवार
कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच वस्तुसंग्रहालय

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00