Home » Blog » Pratapsinh Jadhav : प्रतापसिंह जाधव यांना लो. टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Pratapsinh Jadhav : प्रतापसिंह जाधव यांना लो. टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Pratapsinh Jadhav

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्र शासनाच्या २०२३ साठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.  एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच  २०१९ ते २०२३  या पाच वर्षातील पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. (Pratapsinh Jadhav)

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे २०१९, २०२०. २०२१, २०२२, २०२३  वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ५१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पाच वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन पत्रकारांचा समावेश आहे. (Pratapsinh Jadhav)

कोल्हापूर विभागातून ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०१९ साठी दैनिक पुढारीचे पत्रकार श्री. एकनाथ नाईक यांना, २०२० साठी दैनिक लोकमतचे पत्रकार भारत चव्हाण यांना तर सन २०२३ चा पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार शिवाजी यादव यांना जाहीर झाला आहे.

शासकीय गटातून (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार माहिती व जनसंपर्क) राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांना २०१९ मधील चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी  वृषाली पाटील यांना २०२३ मधील कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच २०१९ च्या केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारात कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील तत्कालीन छायाचित्रकार व सध्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत रोहित कांबळे यांचाही या पुरस्कारात समावेश आहे. (Pratapsinh Jadhav)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00