Home » Blog » Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांनी भिडेंना अटक करावी

Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांनी भिडेंना अटक करावी

प्रकाश आंबेडकर यांची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Prakash Ambedkar

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा दंगलीवेळी केलेली चूक पुन्हा करू नये. त्यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी उर्फ  मनोहर भिडे  यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२७ मार्च) पत्रकारांशी बोलताना केली.(Prakash Ambedkar)

भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय राजे नव्हते त्यांनी हिंदू स्वराज्याची भूमिका मांडली, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन युवराज संभाजीराजे आणि भिडे यांच्यात वाद सुरू आहे. (Prakash Ambedkar)

त्याचा संदर्भ घेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मला देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही अटलबिहारी वाजपेयी यांना आठवा. जो कोणी राजदंड हातात घेतो, त्याला राज्य चालवता आले पाहिजे. जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमध्ये तुरुंगात टाकण्याची संधी असली पाहिजे.  फडणवीस यांनी कोरेगाव भीमाच्या वेळेस संभाजी भिडेंना पाठिशी घालून एकप्रकारे बळ दिले होते. ती चूक आता पुन्हा करु नका, ही माझी अपेक्षा आहे. (Prakash Ambedkar)

‘सौगात-ए-मोदी’ काय आहे?

‘सौगात-ए-मोदी’वरुन आंबेडकर यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लिम समुदायाला ३२ लाख किट वाटण्यात येणार आहेत. या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत.  इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. सत्तेत आल्यापासून त्यांची मुस्लिम विरोधी भूमिका राहिली आहे. गोध्रा घडवण्यात आलेले आहे. रेल्वेचे डब्बे जुने घेतले, जळाले नाही आणि आतून जळाले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केले जाते आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात.’ (Prakash Ambedkar)

शंकेला वाव
मुस्लिमांना साईडट्रॅक करायचे, हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘सौगात-ए-मोदी’ कार्यक्रम येतो, तेव्हा शंका येते. हा राजकीय दृष्टीने केलेला कार्यक्रम आहे. २२ टक्के हिंदू देशाबाहेर बाहेर जाऊ पाहात आहे, त्यामुळे हे कृत्य केले जात आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन सुरु आहे. मौलवींनी भूमिका घेतली पाहिजे आणि सांगितले पाहिजे ही किट घ्यायची की नाही. आपल्याला फसवले तर जात नाही ना? याचा विचार कट्टरपंथी हिंदूनी करण्याची वेळ आली असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा :
फुटीरतावाद शेवटची घटका मोजतोय
भाजपने हिंदुत्व सोडले का?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00