मुंबई : प्रतिनिधी : प्रसिध्द हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पंडीत प्रभाकर कारेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. गेली दोन वर्षे ते यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.(prabhakar karekar)
प्रभाकर कारेकर यांचा जन्म १९४४ मध्ये गोव्यातील म्हापसा येथील दैवज्ञ कुटुंबात झाला. त्यांचे वडील जनार्दन कारेकर यांना संगीताची आवड होती. दर गुरुवारी त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात प्रभाकरही सहभागी होत असत. शाळेच्या स्नेहसंमेलनात पंडीत हळदणकर यांची दोन नाट्यपदे प्रभाकर यांनी गायिली. त्यांचे गाणे ऐकणाऱ्यांनी काही परिचितांनी त्यांच्या वडिलांना प्रभाकर यांना गाणे शिकण्यासाठी मुंबईला पाठवण्यास सांगितले. प्रभाकर यांना घेऊन त्यांचे वडील पंडीत सुरेश हळदणकर यांच्याकडे घेऊन गेले. प्रभाकर यांचा आवाज ऐकून त्यांनी हळदणकर यांनी प्रभाकर यांच्या घरीच राहण्यास सांगितले. त्यानंतर सलग दहा वर्षे प्रभाकर कारेकर यांनी हळदणकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे नऊ वर्षे आणि पंडित सी.आर. व्यास यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत स्वत:ची शैली विकसीत केली.(prabhakar karekar)
‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘करिता विचार सापडले वर्म’, ‘वक्रतुंड महाकाय…’ ‘हा नाद सोड’ ‘नभ मेघांनी आक्रंदिले’ यांसारख्या अनेक लोकप्रिय रचना त्यांनी गायिल्या. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनासाठी अनेक संगिताचे कार्यक्रम केले. ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय ठरला.
त्यांना तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमी, लता मंगेशकर पुरस्कार, गोमान्त विभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. (prabhakar karekar)
हेही वाचा :
छावा’ची ओपनिंग १० कोटींकडे
माघी पौर्णिमेला महाकुंभमध्ये महापूर