Home » Blog » Police Leaker Party : पोलीस ठाण्यात दारु पार्टी आणि छमछम

Police Leaker Party : पोलीस ठाण्यात दारु पार्टी आणि छमछम

पोलीस अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी अटकेत

by प्रतिनिधी
0 comments
Police Leaker Party

छापरा (बिहार) : बिहार राज्यातील छापरा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता तिथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दारु पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्यात बारबालांचा डान्सही होत असतो, असे ग्रामस्थानी सांगितले. पोलिसांनी एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. (Police Leaker Party)

बिहारमध्ये दारुबंदी असली तरी पोलिसांच्या आशिर्वादाने दारु विक्री केली जाते. छापरा जिल्ह्यातील मशरख (सारण) पोलीस ठाण्यात दारुची पार्टी सुरू असल्याची माहिती सारणचे एसपी कुमार अशिष यांना मिळाली. त्यांनी विशेष पथकाला छापा मारण्यास सांगितले. छापा मारणाऱ्या पोलिसांना ठाण्यात काहीच मिळाले नाही पण एका खोलीचा दरवाजा बंद होता. पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी दारु पित असल्याचे आढळून आले. दारु पार्टीत सहभागी झालेल्या पोलिसांची चाचणी घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुनील कुमार, हवालदार कुंदन कुमार आणि कॉन्स्टेबल संतोष कुमार यांना पोलिस ठाण्यात दारु पार्टी केल्याबद्दल अटक केली. (Police Leaker Party)

 परिसरातील ग्रामस्थानी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत बारडान्सरना पोलिस ठाण्यात बोलावून पार्टी केली जाते. बार डान्सर ठुमके मारत पोलिसांना दारु सर्व्ह करतात. अशा पार्ट्या वारंवार होतात, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा :
रूग्णालयात डांबले, शॉक दिले…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00