इंदूर (मध्य प्रदेश) : ‘पुष्पा टू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट्ट ठरला. अजूनही हा चित्रपट गल्ला गोळा करत आहे. यातील अल्लू अर्जुनबरोबर पोलीस अधिकारी शेखावतची भूमिकाही चांगलीच गाजली आहे. पोलीस अधिकारी शेखावत सर भूमिका साकारलेल्या या अभिनेत्यासारख्याच एका पोलिस कॉन्स्टेबलचा मोटारसायकलवरुन सिगारेट ओढत जाणाऱ्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. या व्हिडिओला २ कोटी चाळीस लाख व्ह्यू मिळाले आहेत, पण या व्हिडिओमुळे पोलीस खात्याची अब्रू जात असल्याची प्रतिक्रिया उमटली. पोलीस खाते खडबडून जागे झाले. वरिष्ठांनी कॉन्स्टेबलला फैलावर घेतले. त्याला माफी मागायला लावली. दंड ठोठावला, विभागीय चौकशीही सुरू केली. (Police Fined)
इंदूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल जितेंद्र सिंह तंवरचा बाइकवर सिगारेट ओढत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर जितेंद सिंहला हजर करण्यात आले. अधिकाऱ्यांनी जितेंद्रसिंहची चांगली कानउघाडणी करुन त्याला दंड ठोठावला. माफी मागणारा व्हिडिओ करून तो पोस्ट करायला सांगितले. ‘आपल्या चेहऱ्याचा चांगल्या कामासाठी उपयोग कर’ अशी कडक समज अधिकाऱ्यांनी दिली. (Police Fined)
व्हिडिओमध्ये जितेंद्र सिंह विनाहेल्मेट बाईकवर आहे. त्याच्यासोबत असलेल्या युवकानेही हेल्मेट घातले नव्ह्ते. तसेच जितेंद्र सिंह खुलेआम सिगारेट ओढत असल्याने त्याच्याकडून गुन्हा झाला आहे. हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केल्यानंतर जितेंद्र सिंहने मीडियासमोर माफी मागितली आहे.
शेखावत सर स्टाईलचा व्हिडिओ डामोह नावाच्या युवकाने बनवला तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. माझा चेहरा पुष्पा चित्रपटातील आयपीएस शेखावतशी मिळताजुळता असल्याने हा व्हिडिओ व्हायरल झाला. माझ्यासारखी कृती करु नये, असे आवाहन जितेंद्र सिंहने केले आहे. (Police Fined)
या संदर्भात क्राईम ब्रँचचे ॲडिशनल डीसीपी राजेश दंडोततियांनी सांगितले की, एका युवकाने कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल केला. वर्दीमधला पोलिस बाईकवर बसला होता. तो पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्रसिंह तंवर असून पीआरटीएसमध्ये कॉन्स्टेबल पदावर आले. त्याने हेल्मेट घातले नव्हते. त्याचे वर्तन पाहून त्याला ट्रॅफिक नियमानुसार दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दलही दंड ठोठावण्यात आला. त्याच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू झाली आहे. त्याला नोटीस पाठवण्यात येणार आहे. ज्याने व्हिडिओ बनवला आहे त्यालाही समज देण्यात आली आहे.
हेही वाचा :