कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी (दि.३० मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ या संघातील खेळाडूंनी सामना सुरू असतानाच मैदानावर राडा केला. पंचांनी या सामन्यात दोन्ही संघातील ११ खेळाडूंना रेड कार्ड दाखवले. या खेळाडूंवर कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने (केएसए) बडगा उगारला असून पाटाकडील संघाचा स्टार खेळाडू ओंकार मोरे आणि शिवाजी संघाचा संकेत नितीन साळोखे या दोन खेळाडूंवर पूर्ण हंगामातील सामन्यात खेळण्यास बंदी घातली आहे. दोन्ही संघांतील अन्य नऊ खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. पाटाकडील संघास १४ हजार रुपयांचा दंड तर शिवाजी संघास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Players banned)
गेले काही वर्षे कोल्हापूरच्या फुटबॉलला हुल्लडबाजीच ग्रहण लागले आहे. बलाढ्य संघातील समर्थक आणि खेळांडूमध्ये मारामारीचे प्रकार वाढले आहेत. पण रविवारी झालेल्या उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यातील शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ संघातील खेळाडूंच्या राड्याने कळस गाठला. दोन्ही संघावर कारवाई करावी अशी मागणी फुटबॉल शौकिनांकडून होत होती. शिखर फुटबॉल संघटना केएसएने खेळाडूंवर कायद्याचा बडगा उगारला आहे. केएसएचे सचिव माणिक मंडलिक आणि फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये पाटाकडील संघाचा ओंकार मोरे आणि शिवाजी संघाच्या संकेत नितीन साळोखे या दोघांवर पूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील हंगामापर्यंत दोन्ही खेळाडूंना घरात बसावे लागणार आहे. ओंकार मोरेकडून वारंवार गैरवर्तन झाल्याने त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. (Players banned)
दोन सामन्यांची बंदी असलेले खेळाडू असे
यश देवणे, ऋषिकेश मेथे पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, जय कामत, रोहित पोवार (सर्व पाटाकडील तालीम मंडळ). करण चव्हाण बंद्रे, विशाल पाटील, सुयश हांडे, अमन सय्यद (सर्व शिवाजी तरुण मंडळ). (Players banned)
दोन्ही संघांना आर्थिक दंड
सामन्यात सहा पेक्षा जास्त खेळाडूंना कार्ड मिळाल्याने दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाटाकडीलच्या सहा खेळाडूंना रेड कार्ड दाखवल्यानंतरही ते ड्रेसिंग रुममध्ये न जाता पॅव्हेलियनच्या बाजूला मैदानाच्या कोपऱ्यातून खेळाडूंना सुचना देत होते. या कृतीबद्दल संघास तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सामन्याच्यावेळी पाटाकडील संघाचे व्यवस्थापक धनंजय यादव आणि सह व्यवस्थापक रुपेश सुर्वे यांनी मोबाईलचा वापर केल्याबद्दल त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Players banned)
हेही वाचा :