नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलची फेब्रुवारी २०२५ साठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी निवड झाली. फेब्रुवारी महिन्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे गिलने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला मागे टाकत हा प्रतिष्ठित सन्मान मिळवला. (Player of month)
शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१.५० च्या सरासरीने आणि ९४.१९ च्या स्ट्राईक रेटने ४०६ धावा फटकावल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ३-० अशा मालिकेत भारताच्या विजयात त्याचे फलंदाजीतील सातत्य महत्वाचे ठरले होते. त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली. गिलने नागपूरमध्ये ८७ धावांनी सुरुवात केली. त्यानंतर कटकमध्ये ६० धावा केल्या. अहमदाबादमध्ये त्याने शतक झळकावले. त्याने १०२ चेंडूत १४ चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांसह ११२ धावा करत मालिकेचा शेवट उत्कृष्ट कामगिरीने केला. या सीरिजमध्ये त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारही मिळवून दिले. (Player of month)
गिलने चाहते आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. शुभमन गिल म्हणाला, “संघाच्या यशात योगदान देणे आणि त्यासाठी मान्यता मिळणे नेहमीच खास असते. माझे लक्ष नेहमीच सकारात्मक खेळण्यावर आणि प्रत्येक संधीचे मूल्यमापन करण्यावर राहिले आहे.” (Player of month)
गिलने २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाजीतील सातत्य कायम ठेवले आहे. दुबईमध्ये बांगला देशविरुद्धच्या भारताच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावत नाबाद १०१ धावा फटकावल्या. त्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध ४६ धावा फटकावल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका होती. फलंदाजीतील त्याच्या कामगिरीमुळे जगातील अव्वल क्रमांकाच्या एकदिवसीय फलंदाज म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले आहे. २०२४ मध्ये त्याच्या शानदार कामगिरीनंतर तो हे स्थान कायम राखत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सामनावीर कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती करत तिसरे स्थान पटकावले आहे. (Player of month)
शुभमन गिलने २०२३ मध्ये जानेवारी आणि सप्टेंबरमध्ये दोनदा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. ही त्याची तिसरी वेळ आहे. जेव्हा शुभमन गिलने २०२३ मध्ये जानेवारी आणि सप्टेंबरमध्ये हा पुरस्कार जिंकला होता. त्याची सातत्य आणि धावांची भूक त्याला जागतिक क्रिकेटमधील सर्वांत तेजस्वी स्टार खेळाडू म्हणून गणला जात आहे.
हेही वाचा :
ब्रेसवेलकडे न्यूझीलंडचे नेतृत्व
मयंक आयपीएलच्या पूर्वार्धास मुकणार