महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अमेरिकतील वॉशिंग्टन येथील रोनाल्ड रिगन राष्ट्रीय विमानतळावर प्रवासी जेट विमान आणि हॅलिकॉप्टरची हवेत टक्कर झाली. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी नदीतून २८ मृतदेह बाहेर काढले आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान अपघातातील सर्वच सर्व ६७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (plane-crashes)
अपघातानंतर रिगन विमानतळावरुन सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. जेट विमानात ६० प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. लष्करी हॅलिकॉप्टरमध्ये तीन अमेरिकन सैनिक होते. विमानतळाकडे जाताना जेट विमान ४०० फूट उंचीवर होते. विमानाचा वेग सुमारे १४० मैल प्रति तास होता. या विमानाची यूएस आर्मी ब्लॅकहॉक हॅलिकॉप्टरला धडक बसली. विमान गोठलेल्या नदीत कोसळले. अपघानंतर मदतकार्यास ताबडतोब सुरूवात झाली. यूएस पार्क पोलीस, डीसी मेट्रॉपॉलिटन पोलीस विभाग, यूएस सैन्यासह अनेक यंत्रणा नदीमध्ये प्रवाशांचा शोध घेत आहेत. बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी फायरबोटही तैनात करण्यात आली आहे. (plane-crashes)
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक्स पोस्टवर झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. पण ट्रम्प यांनी ‘हॅलिकॉप्टरने विमानाला का टाळले नाही? असा प्रश्न केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये असे म्हटले आहे की विमानतळाकडे जेट विमान योग्य आणि नियमित मार्गावर होते. या मार्गावर हेलिकॉप्टर जात होते. रात्रीचे वातावरणही स्वच्छ होते. विमानातील दिवे चमकत होते. हॅलिकॉप्टर वर किंवा खाली का गेले नाही. किंवा कंट्रोल टॉवरने का सांगितले नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. (plane-crashes)
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी फॉक्स न्यूजशर बोलताना सांगितले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. सुरवातीच्या माहितीनुसार, लष्करी हॅलिकॉप्टर आणि प्रादेशिक प्रवासी जेट यांच्यात हवेतच टक्कर झाली. त्यामुळे हा अपघात झाला.
युएस परिवहन सचिव सीन डफी यांनी म्हटले आहे की हा अपघात टाळता येणे शक्यत होते. पण विमान आणि हॅलिकॉप्टरमधील सर्व जण ठार झाल्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. वॉशिग्टंन फायर चीफ जॉन डोनली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या क्षणी आम्हाला कोणी वाचलेले आहेत याचा आम्हाला विश्वास नाही. आम्ही आता अशा टप्प्यावर आहोत जिथे आम्ही बचाव मोहिमेतून पुनप्राप्ती ऑपरेशनकडे स्विच करत आहोत. डोनली यांनी सांगितले की आम्ही विमानातून २७ तर हेलिकॉप्टरमधून एक मृतदेह बाहेर काढला आहे.
फिगर स्केटिंग खेळाडूंचा मृत्यू झाल्याची भीती
वॉशिग्टंनच्या पोटोमॅक नदीत फिगर स्केटिंग क्रीडा प्रकारातील रशियन जोडी इव्हगेनिया आणि वदीम नोमाव्ह यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे प्रशिक्षकही होते अशी माहिती पुढे आली आहे. या आठवड्यात विचिटा, कॅन्सस येथे झालेल्या चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर ते प्रशिक्षणांसाठी शिबिरात जाणार होते. त्यांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेतील कोणत्याही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही, पण रशियाच्या राज्य टीएसएसस आणि आयआयए वृत्तसंस्थांनी काही स्त्रोतांचा हवाल देऊन या दु:खद अपघातामुळे धक्का बसला असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा :