मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यभरातून हल्ला होत असताना स्वाभिमान असणारी कोणतीही व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. मात्र नैतिकता आणि या लोकांचा काही संबंधच नाही आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली.(Pawar slams Munde)
दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत संमेलनातील वाद व राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले.
मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, मी मस्साजोगला जाऊन आलो आहे. त्या गावातील लोकांच्या भावना मी समजू शकतो. कोणालाही स्वाभिमान असेल अशी व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यातून लोकांचा हल्ला होत आहे तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचे, ही भूमिका घेऊन हे लोक वागत आहेत. त्यामुळे याबाबत राज्यकर्त्यांना काय सांगण्याची गरज नाही.(Pawar slams Munde)
दिल्लीत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले की, संमेलनाला माझ्या अंदाजाने ६ ते ७ हजारांच्या आसपास लोक आले होते. साहित्य संमेलनात काही ना काही वाद होतातच. साहित्य संमेलनाचे इतर कार्यक्रम तालकटोरात झाले. वादाचे स्वरुप गंभीर नव्हते. साहित्य संमेलन यशस्वी झाले हे संमेलन दिल्लीत दुसऱ्यांदा होतं आहे. पहिलं संमेलन जे झालं त्यांचें नेतृत्व जवाहरलाल नेहरूंकडे होतं. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. मी या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही.(Pawar slams Munde)
साहित्य संमेलनाचा वापर राजकारणासाठी होतोय हे मात्र खरे नाही. मला मान्य नाही, अशी भूमिका स्पष्ट करून ते म्हणाले, यादी पाहा. ग्रंथ दिंडीत कोणीही राजकीय नव्हते. उद्घाटनात पंतप्रधान मोदी, मी आणि फडणवीस होते. दुसऱ्या सत्रात शिंदे होते. महत्त्वाचा कार्यक्रम होता. तिसरी मुलाखत मराठी पाऊल पडते पुढे यात एकही राजकीय नव्हते. मनमोकळा संवादात ज्ञानेश्वर उबाळे होते. राजदीप सरदेसाई होते. मंजिरी वैद्य या कार्यक्रमात होते. यातही कोणी राजकीय नेते नव्हते. त्यानंतरच्या परिसंवादातही कुणी राजकीय नव्हते. लोकसाहित्य ते भैरवी यात संवादातही राजकारणी नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा
नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य मूर्खपणाचे