कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विना परवाना उभारण्यात आला आहे. हा पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असताना पुतळा हटवण्यास शिवप्रेमींनी विरोध केला. या तणावपूर्ण परिस्थितीत अखेर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. पुतळ्याला लवकरच परवानगी दिली जाईल आणि त्यानंतर पुतळा खुला करण्यात यावा. तोपर्यंत पुतळा झाकून ठेवावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्यानंतर गावातील तणाव टळला. (Pattankodoli)
पट्टणकोडोलीतील जुना एस.टी.स्टँडजवळ शिवप्रेमींनी गनिमीकावा करुन नवीन चबुतरा बांधून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. गुढीपाडव्याच्या पहाटे महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले. पण पुतळा हटवू नये अशी मागणी शिवप्रेमींनी केली. गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन महत्वाचे सण असल्याने पोलिसांनीही प्रशासनाने टाळली. (Pattankodoli)
आज बुधवारी प्रशासनाने पुतळा हटवण्यासाठी जोरदार तयारी केली. पुतळा विनापरवाना असल्याने तो हटवण्यासाठी इचलकरंजीचे डीवायएसपी समीर साळवे मोठा पोलिस फौजफाटा घेऊन आले. पण पुतळा हटवण्यास शिवप्रेमींनी विरोध केला. गावात तणाव वाढला असल्याने संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. घटनास्थळी इचलकरंजीच्या प्रातांधिकारी मौसमी चौगुले, नायब तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने गावाला छावणीचे स्वरुप आले. दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात शिवसेनेच्या काही नेत्यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आहे त्या ठिकाणी पुतळा राहू द्या असे अधिकाऱ्यांना सांगितले. पुतळ्याला परवानगी मिळेपर्यंत तो झाकून ठेवण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आली. त्यानंतर पुतळा हटवण्याची मोहीम स्थगित करण्यात आली. (Pattankodoli)
पट्टणकोडोली अतिसंवेदनशील गाव
पट्टणकोडोली हे अतिसंवेदनशील गाव आहे. या गावात जातीय संघर्षामुळे यापूर्वी तणाव निर्माण झाले आहेत. काही वेळा दंगलसंदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ज्येष्ठ मंडळी सजग असतात. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन गावात तणाव होऊ नये यासाठी ज्येष्ठांकडून प्रयत्न झाले. अखेर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याने गावातील तणाव कमी झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (Pattankodoli)
हेही वाचा :
एकही गैर-मुस्लिम वक्फमध्ये नसेल
सर्वांत मोठ्या पक्षाला अध्यक्ष निवडता आलेला नाही