बेंगळुरू : माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांची भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाईकरण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. यावर पाटील यांनी, घराणेशाहीच्या राजकारणावर आणि भ्रष्टाचारावर टीका केल्यामुळे माझी हकालपट्टी करण्यात आली. मात्र मी उत्तर कर्नाटकसाठी काम करत राहीन, असे पाटील यांनी म्हटले आहे.(Patil expelled from bjp)
पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने पाटील यांच्या हकालपट्टीचा निर्णय बुधवारी (२६ मार्च) निर्णय जाहीर केला. यत्नाळ यांनी पक्षाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे निर्देशही यासंबंधीच्या निवेदनात देण्यात आले आहेत. (Patil expelled from bjp)
पाटील यांना १० फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या उत्तराचा आढावा घेतल्यानंतर, त्यांनी पक्षाच्या शिस्तीचे पालन करण्याचे आश्वासन देऊनही सातत्याने उल्लंघन केले आहे. परिणामी, भाजप नेतृत्वाने त्यांना तात्काळ निष्कासित करण्याचा निर्णय घेतला, असे समितीने म्हटले आहे.
दरम्यान, हकालपट्टीवर पाटील यांनी एक्स सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली. त्यात त्यांनी पक्षातील घराणेशाही राजकारण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्याबद्दल शिक्षा झाली आहे. सुधारणांचे समर्थन करण्यासाठी, हुकूमशाही नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी आणि उत्तर कर्नाटकच्या विकासाची मागणी सातत्याने लावून धरत असल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे. काही स्वार्थी हितसंबंधांनी त्यांचे स्वतःचे अजेंडे पूर्ण करण्यासाठी माझी हकालपट्टी केली आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. (Patil expelled from bjp) “मला काढून टाकण्याचा निर्णय भ्रष्टाचार, कौटुंबिक राजकारण आणि उत्तर कर्नाटकच्या विकासाविरुद्धच्या माझ्या लढाईत अडथळा आणणार नाही. मी त्याच समर्पणाने आणि दृढनिश्चयाने लोकांसाठी काम करत राहीन,” असे पाटील म्हणाले.
हेही वाचा :
जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी
उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे