Home » Blog » Patil criticize : जग अवकाशात, आपण कबरीच्या मागे

Patil criticize : जग अवकाशात, आपण कबरीच्या मागे

जयंत पाटलांची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Patil criticize

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. बाहेरच्या देशांनी सुनीता विल्यम्स् यांना पृथ्वीवर सुखरुप परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. (Patil criticize)

विधानसभेत विरोधी पक्षाच्या २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा झाली. त्यावर ते बोलत होते. जयंत पाटील यांनी राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, कैलास नागरे यांनी शिवारात कायमची पाण्याची चणचण होती. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारले होते. ओव्हर फ्लो झालेल्या खडकवासला धरणातून पाणी सोडावे अशी त्याची मागणी होती. तसे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु मार्च महिना ओलांडूनही शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यात राज्यकर्ते कमी पडत आहेत अशी टीका त्यांनी केली. (Patil criticize)

जयंत पाटील म्हणाले, तोट्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कुंचबना होत आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत. मागील वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. योग्य सिंचन व्यवस्था आणि वीज पुरवठा नाही. जीएसची भार आणि सावकारी कर्जाचा पाश यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मात्र अदयाप शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. (Patil criticize)

हेही वाचा :

मंत्री गोरेंवर आरोपी करणारी महिला अटकेत

कोरटकरांवर अटकेची टांगती तलवार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00