मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता. त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (Padvekar)
प्रशांत कोरटकर अटकेसंदर्भात गौप्यस्फोट करत लोंढे म्हणाले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली. त्यावेळी प्रतिक पडवेकर हा प्रशांत कोरटकर सोबत होता. मग त्यांना का लपवून ठेवले आहे?. त्याला का दाखवत नाहीत?. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते?, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. (Padvekar)
अतुल लोंढे म्हणाले, प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे असेही त्यांनी सांगितले. (Padvekar)
कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी कोरटकरची चौकशी. त्यामध्ये त्याला मदत करणाऱ्या पाच जणांची नावे निष्पण झाली आहेत. त्याला प्रशिक पडवेकर (रा.नागपूर), धीरज चौधरी (रा. चंद्रपूर), हिमायत अली (रा. इंदोर, मध्यप्रदेश), राजेंद्र जोशी (रा. इंदोर), साईराज पेटकर (रा. करीमनगर) यांनी मदत केली होती. कोरटकरला मदत करणाऱ्यांची पोलिस चौकशी करणार आहेत. कोरटकरने धीरज चौधरी यांच्या वाहनाचा वापर केला होता. एकूण चार वाहने वापरली होती. त्यापैकी एक वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. (Padvekar)
हेही वाचा :
कोरटकरला मदत करणाऱ्यांची चौकशी होणार