Home » Blog » Oscar: ॲण्ड ऑस्कर गोज टू…

Oscar: ॲण्ड ऑस्कर गोज टू…

‘अनोरा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट; मिकी मॅडिसन सर्वोकृष्ट अभिनेत्री ॲड्रिन ब्रॉडी सर्वोत्कृष्ट अभिनेता

by प्रतिनिधी
0 comments
Oscar

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जगभरातील सिनेजगत आणि सिनेरसिकांची उत्कंठा असलेला ऑस्कर अवॉर्ड सोहळा (९७ वा अकादमी पुरस्कार) २ मार्च रोजी पार पडला. या सोहळ्यात सर्वोष्कृष्ट चित्रपटाचा मान ‘अनोरा’ या सिनेमाने पटकावला. याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिकी मॅडिसन तर शॉन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘अनोरा’ने सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा पुरस्कारही मिळवला.(Oscar)

‘द ब्रुटालिस्ट’ मधील दमदार अभिनयाबद्दल ॲड्रिन ब्रॉडी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले.

शॉन बेकरने ‘अनोरा’ या सिनेमाच्या निमित्ताने हा तिसरा ऑस्कर जिंकला. आपल्या भाषणात बेकर यांनी थिएटर्सचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच चित्रपट निर्मात्यांना मोठ्या पडद्यासाठी चित्रपट निर्मितीचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले.(Oscar)

ॲड्रिन ब्रॉडी यांनी ब्रॅडी कॉर्बेट दिग्दर्शित ‘द ब्रुटालिस्ट’ मध्ये नेहमीसारखाच दमदार अभिनय केला आहे. ब्रॉडी यांनी पटकावलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दुसरा ऑस्कर आहे. टिमोथी चालमेट आणि राल्फ फिएनेस यांच्यातील जोरदार प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले. ब्रॉडीच्या लास्झ्लो टोथच्या चित्रणाची सर्वत्र प्रशंसा झाली.

मिकी मॅडिसनची ‘अनोरा’मधील भूमिका वाखाणली गेली. तिच्या अभिनयाची खोली आणि बारकावे याचे समीक्षकांनी समरसून कौतुक केले. एका गुंतागुंतीची व्यक्तीरेखा तिने यानिमित्ताने उभी केली आहे.(Oscar)

झो साल्दानाने ‘एमिलिया पेरेझ’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. या सोहळ्यात ती खूपच भावूक झाली होती. तिने आपले स्थलांतरित पालक आणि पतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन आणि कॉस्च्युम डिझाईनचा पुरस्कार ‘विक्ड’ने पटकावला. पॉल टेझवेलने इतिहास रचला. पोशाख डिझाइनसाठी ऑस्कर मिळवणारी ती पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती ठरली.(Oscar)

https://twitter.com/TheAcademy/status/1896407955198939643/photo/1

पुरस्कार विजेते असे

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : अनोरा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : द ब्रुटालिस्टसाठी अॅड्रिन ब्रॉडी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अनोरासाठी मिकी मॅडिसन
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अ रिअल पेनसाठी कायरन कल्किन
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : एमिलिया पेरेझसाठी झो साल्दाना
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अनोरासाठी शॉन बेकर
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : द ब्रुटालिस्टसाठी लोल क्रॉली
  • सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : अनोरासाठी शॉन बेकर
  • सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा : कॉन्क्लेव्ह
  • सर्वोत्कृष्ट मूळ संगीत : द ब्रुटालिस्टसाठी डॅनियल ब्लूमबर्ग
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी : ड्यून भाग दोन
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट : ड्यून भाग दोन
  • सर्वोत्कृष्ट मूळ गाणे : एमिलिया पेरेझमधील एल माल
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य चित्रपट : आय एम स्टिल हिअर
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट : द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
  • सर्वोत्कृष्ट संपादन : अनोरा
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर फिल्म : नो अदर लँड
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिल्म : फ्लो
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट : इन द शॅडो ऑफ द सायप्रस
  • सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन : पॉल टेझवेल – विक्डसाठी
  • सर्वोत्तम मेकअप आणि हेअर स्टायलिंग : द सबस्टन्स
  • सर्वोत्तम प्रोडक्शन डिझाइन : विक्ड
  • सर्वोत्तम लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : आय एम नॉट अ रोबो

हेही वाचा :

वडिल पाकिस्तानी, आई भारतीय, मुलगी पाकिस्तानी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00