जमीर काझी : मुंबई : राज्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत प्रशांत कोरटकरने वापरलेली अवमानकारक भाषा, भाजपाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची झालेली छेडछाड आदी प्रकरणामुळे सोमवारपासून (दि.३) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहेत. भाजप महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत असले तरीही राज्यातील वाढत्या घटना त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे दोन राष्ट्रवादीचे मंत्री विरोधकांच्या टार्गेटवर राहणार आहेत. दोघांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलाविलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (opposition’s target)
अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. १० मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्या सरकारचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने जनतेच्या कोणत्या कामाला प्राधान्य देणार? निवडणूक जाहीरनाम्यातील कोणत्या आश्वासनाच्या पूर्ततासाठी तरतूद केली जाईल?, याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना, वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देताना प्रशांत कोरटकरने केलेला शिवरायांचा अवमान आदी विरोधी पक्षाकडून सरकारला लक्ष्य केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना कसे सामोरे जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. (opposition’s target)
विरोधी पक्षनेता कोण?
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये नैराश्य आले होते. विरोधी पक्ष नेतेपद मिळावे इतके आमदार एकाही विरोधी पक्षाचे निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील समन्वयाचा अभाव असून तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष नेतेपदासाठी अद्याप महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षाकडे नाव देण्यात आलेले नाही . हे पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्याबाबत गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक बोलणे सुरू आहे. त्यानुसार शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र त्यांची निवड याच अधिवेशनात केली जाते का? याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. (opposition’s target)
हेही वाचा :
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जत्रेत छेडछाड
मोहन भागवत महाकुंभला का गेले नाहीत ?