Home » Blog » Open AI vs DeepSeek : चिनी डीपसीकने अमेरिकेला भरवली धडकी

Open AI vs DeepSeek : चिनी डीपसीकने अमेरिकेला भरवली धडकी

मक्तेदार कंपनांच्या फुग्यांमधील काढली हवा

by प्रतिनिधी
0 comments
Open AI vs DeepSeek
संजीव चांदोरकर

अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांच्या सतत फुगणाऱ्या फुग्याला एक चिनी टाचणी टोचली गेली आहे!(Open AI vs DeepSeek)

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची चर्चा गेले काही महिने जोरात सुरू आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक वापरात आल्यानंतर बँकिंग, रिटेल, डेटा अनालिटिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा अनेक क्षेत्रात मानवी बौद्धिक श्रमाची गरज लागणार नाही. त्यामुळे रोजगारावर देखील परिणाम होईल अशा चर्चा वारंवार होत आहेत. ज्यात तथ्य आहेच.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, मेटा, ओपन एआय या कंपन्या आघाडीवर आहेत. ‘एआय’साठी लागणाऱ्या अत्यंतिक प्रगत चिप्स NVIDIA ही अमेरिकन कंपनी बनवत आहे. (Open AI vs DeepSeek)

‘एआय’चे मार्केट, फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील सर्वच देशात पसरलेले असणार आहे. त्यातून वरील अमेरिकन कंपन्यांना ‘न भूतो न भविष्यती,’ असा धंदा मिळेल. आणि अर्थात नफा देखील. या गृहीतकावर आधारित या कंपन्यांचे शेअर्स गेल्या काही वर्षात ऐतिहासिक उंचीवर पोहोचत राहिले.

. . . . .

सोमवारी, २७ जानेवारी रोजी या फुग्याला टाचणी लागली आणि त्यातील हवा सरू लागली. कारण होते एक छोटी चायनीज स्टार्टअप कंपनी : DeepSeek.

DeepSeek चायनीज स्टार्ट अप कंपनीने आपण अमेरिकन कंपन्या ज्या किमतीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रॉडक्ट विकत आहेत त्याच्या पाच ते दहा टक्के किमतीत त्याच कार्यक्षमतेने चालणारी एआय प्रॉडक्ट विकू शकतो हे दाखवून दिले आहे. (Open AI vs DeepSeek)

परिणामी फक्त एका दिवसात अमेरिकन टेक कंपन्यांचे बाजार मूल्य दीड ट्रिलियन डॉलरने घसरले. भारताच्या शेअर मार्केटचे एकूण बाजारमूल्य ५ ट्रिलियन डॉलर आहे. आणि भारताची जीडीपी साडेतीन ट्रिलियन्स डॉलर्स.

NVIDIA चा शेअर १७ टक्यानी घसरला.(Open AI vs DeepSeek)

. . . . . .

खालील आकडे (सोर्स : मनी कंट्रोल) महत्त्वाचे आहेत, आणि छोट्या स्टार्टअपचे महत्व अधोरेखित करतात

  • दहा वर्ष जुनी असणाऱ्या ‘ओपन एआय’ या अमेरिकन कंपनीने आतापर्यंत ६६०० मिलियन डॉलरचे भांडवल ओतले आहे आणि त्यात ४५०० कर्मचारी काम करतात.
  • तर दोन वर्ष जुनी DeepSeek ने फक्त ६ मिलियन डॉलर भांडवल घालून २०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेवढेच कार्यक्षम आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रॉडक्ट बनवले आहे.
  • अत्यंत कमी भांडवल आणि कमी कर्मचाऱ्यांमुळे DeepSeek खूप कमी किमतीत तीच प्रोडक्ट्स विकू लागली आहे.(Open AI vs DeepSeek)
  • त्यामुळे अमेरिकन एआय कंपन्यांच्या तुफान नफा कमवण्याच्या क्षमतेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
  • अमेरिकेने या आधीच आपल्या देशातील कंपन्यांना कोणत्याही प्रकारची सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी निर्यात करण्यास बंदी घातली आहे.
  • बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे चीनने अमेरिका कोणकोणत्या चाली रुचू शकतो याचा अंदाज घेत आधीच व्यूहरचना केलेली आहे, असे दिसते. (Open AI vs DeepSeek)

. . . . . .

ही आहे छोट्या स्टार्ट अपची ताकद. जी महाकाय कंपन्यांची हवा एक टाचणी टोचून काढून घेऊ शकते. विशेषतः तंत्रज्ञान प्रधान क्षेत्रात.

  • अक्राळ विक्राळ वाढणाऱ्या मक्तेदार कंपनांच्या फुग्यांमधील हवा काढण्यासाठी एक टाचणी पुरेशी असते हे ते सिद्ध करतात.
  • मक्तेदार कंपन्या एवढ्या खतरनाक होऊ शकतात कि त्यांच्या प्रॉडक्ट / तंत्रज्ञान / पेटंट / नफा यांना सुरुंग लावू शकणाऱ्या शास्त्रज्ञाना, तंत्रज्ञाना/ नवं उद्योजनकांचे ते काहीही करू शकतात. अचानक कोणी गायब झाल्याची बातमी येते.
  • भारताला, विविध क्षेत्रातील, अशा हजारो टेक्नॉलॉजी स्टार्ट अपची नितांत गरज आहे.

(२८ जानेवारी २०२५)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00