Home » Blog » Open AI : ‘ओपन एआय’ने मस्कची ऑफर फेटाळली

Open AI : ‘ओपन एआय’ने मस्कची ऑफर फेटाळली

कंपनी विक्रीसाठी नव्हे मानव जातीच्या कल्याणासाठी…

by प्रतिनिधी
0 comments

वॉशिंग्टन : ओपन एआय विक्रीसाठी नाही, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणसाठी कंपनी कार्यरत राहील, असे आश्वस्त करत कंपनीने एलन मस्क यांची ९७.४ अब्ज डॉलर्सची ऑफर फेटाळली. (Open AI)

‘ओपनएआय विक्रीसाठी नाही. संचालक मंडळाने मस्क यांचा स्पर्धेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न एकमताने नाकारला आहे,’ असे ओपनएआयच्या बोर्डाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे की, ‘ओपन एआयची कोणतीही संभाव्य पुनर्रचना करताना संपूर्ण मानवजातीचा फायदा लक्षात घेईल. कंपनीचे हे ध्येय मजबूत करेल.’(Open AI)

ओपनएआय संचालक मंडळाने ‘ना-नफा मॉडेल’कडे वळण्याचा निर्णय घेतल्याने मस्क यांनी बुधवारी न्यायालयात कागदपत्रे सादर केली. तसेच कंपनीने ‘ना नफा’ धोरण स्वीकारले असेल तर आम्ही आमची ऑफर परत घेत आहोत, असे मस्क यांनी म्हटले आहे.

ओपन एआय सध्या ना-नफा म्हणून काम करते. कंपनीच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या नफ्यासाठीच्या मॉडेलकडे वळणे हा मस्क आणि कंपनीमधील मतभेदाचा मुद्दा असल्याचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी म्हटले आहे.(Open AI)

ओपन एआयच्या मूळ संस्थापकांपैकी मस्क एक आहेत. २०१५ मध्ये कंपनी स्थापन करण्यात आली. मस्क यांनी कंपनीत ४५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, पण कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे  टेस्लासोबत ‘संभाव्य भविष्यातील संघर्षा’मुळे त्यांनी २०१८ मध्ये कंपनी सोडली.

२०२३ मध्ये, ओपन एआयने या क्षेत्रात प्रगती केले. जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मस्कनी एक्सएआय कंपनी (xAI) सुरू केली.

एआय मॉडेल्स विकसित करण्याबरोबरच ते चालवण्याचा खर्च मोठा आहे. त्यामुळे ओपन एआयला गुंतवणूक आणि नवीन कॉर्पोरेट शोधावे लागणार आहे. नफ्याचे मॉडेल आणण्यासाठी कॅलिफोर्निया आणि डेलावेअरमधील अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक आहे. ते कंपनीच्या ना-नफा धोरणाचे मूल्य कसे मोजले जाते याचे पुनरावलोकन करतील.(Open AI)

ओपन एआयचे मुख्य जागतिक घडामोडी अधिकारी ख्रिस लेहाने यांनी सांगितले की, मस्क यांची ऑफर एक स्पर्धक म्हणून लक्षात घ्यावी लागेल. त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आणि बाजारपेठेत आमच्याशी स्पर्धा करण्यासाठी संघर्ष केला आहे.

हेही वाचा :

 भारत-अमेरिका ‘मेगा पार्टनरशिप’!
मित्राचा खिसा भरणे हीच मोदींसाठी ‘राष्ट्रनिर्मिती’!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00