Home » Blog » नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा

Navratri Ustav 2024 : जाणून घ्या चंद्रलांबा परमेश्वरी देवीची कथा

by प्रतिनिधी
0 comments
Navratri Ustav 2024

कोल्हापूर; प्रतिनिधी : योग मार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्‌मयात आढळतो. ही देवी म्हणजेच महामाया सीतेचाच अवतार आहे. ही देवी भगवान दत्तात्रेयांवर कृपा करणारी आहे. त्यामुळे तिच्या बिरुदावलीत ‘अवधुत कृपावंती’ असे नाव आहे. (Navratri Ustav 2024)

चंद्रलांबा परमेश्वरी देवीची कथा

शेस कन्येपासून इंद्रास सेतूराज नावाचा मुलगा प्राप्त झाला. हा सेतूराज म्हणजे समुद्रनाथ किंवा समुद्रदेव होय. श्री प्रभू राम लंका विजया नंतर अयोध्येत परतल्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला. पण समुद्ध नाथाला आमंत्रण दिले नाही. त्यामुळे त्याने अयोध्येत येऊन प्रभुरामचंद्रांचे निर्भित्सना केली. त्यावेळी सीतामाईंनी त्याला शाप दिला की या यःकश्चित भ्रमरांकडून तुझा प्राण जाईल व तुझा अहंकार नष्ट पावेल. पुढे हा समुद्रनाथ इंद्रपोटी व शेषकन्ये पोटी सेतूराज म्हणून जन्मला.

हा सेतूराज पुढे सर्व शास्त्राने पारंगत झाला व त्याने प्रत्यक्ष शंकरास प्रसन्न करून घेतले. व शास्त्राने मरण येणार नाही असा वर प्राप्त केला. साधु, संत, ब्राम्हण, ऋषी, सूती यांना त्रास दिल्यास वर नष्ट होईल असे शंकरांनी सांगितले. पण तो उन्मत झाला. पाप पुण्याचा फरक कळेना. तो भ्रष्ट होऊन वावरू लागला. एकदा अरण्यात फिरत असताना ती नारायण मुनींची पत्नी चंद्रवदनेस पाहून मोहित झाला. ते नसताना तिच्या लोभाने तिचे हरण करण्या प्रवृत्त झाला. नारायण मुनी ना हे यथावकाश कळताच त्यांनी त्यास अविचार पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. नारायण मुनिनें हिमालयात जाऊन हिंगुळा देवीस प्रसन्न करून घेतले व देवी त्यांच्या सोबत निघाली मागे फिरून न पाहण्याची आज्ञा केली. पण त्या ठिकाणी मुनिना आवाज येईना म्हणून त्यांनी मागे फिरून पाहिले. देवीने आता येथेच राहून कार्य करीन असे सांगितले. देवीने एक घट मुनिंना दिला व सेतूराजाच्या प्रांगणात फोडण्याची आज्ञा केली. मुनिनी सेतूराजाच्या प्रांगणात घट फोडले ‘ त्यातून पाच भ्रमर निघाले.

पुढे त्या भ्रमरातून असंख्य भ्रमर निघाले. व राजाचे सर्व सैन्य भ्रमर दंशाने मारले गेले. सेतूराजाच्या अंगाचा दाह झाला. त्याचा दाह शांत करण्यासाठी त्याने भीमा नदीत जीव दिला. व वर सेतू राजाचा शेवट झाला. नारायण मुनिनी देवीस प्रार्थना करून सन्मत्ती या क्षेत्री आणले. व तेथे स्थापना केली. हीच ती चंद्रलांबा देवी. नंतर देवीने- साऱ्या भ्रमराना आज्ञा केली ते सारे पुन्हा पाच भ्रमर झाले. उजव्या पायात तीन व डाव्या पायात दोन भ्रमर गुप्त झाले. श्री क्षेत्र सन्नत्ती भीमा नदीच्या तीरावर असून जिल्हा गुलबर्गा कर्नाटक येथे आहे. हिला हिंगुळांबा किंवा भ्रमरांबा देवी संबोधतात.

ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनिश्वर, मयुर मुकुंद मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यानी बांधली.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00