Home » Blog » Old pension  : शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

Old pension  : शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Old pension

मारुती फाळके :  कोल्हापूर : शिक्षक सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा, गोर गरिबांच्या शाळा बंद करणारा संचमान्यतेचा अन्यायी निर्णय बदला, आश्वासित योजना लागू करा, समान काम समान वेतन या मागण्यासाठी  महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेने शिक्षण उप संचालक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिका,नगरपालिका शाळांतील शिक्षक आणि शिक्षणसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Old pension)

यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले, समान काम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक सारखे वेठबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लढण्यास सज्ज आहे. आगामी  काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल. (Old pension)

यावेळी एस.डी.लाड, भरत रसाळे, सांगली जुनी पेंशन चे जिल्हाध्यक्ष अमोल माने,सागर खाडे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे,शिक्षक संघ राज्य संपर्क प्रमुख राजमोहन पाटील,गौतम वर्धन, संघटनेचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड,कार्याध्यक्ष बालाजी पांढरे,शिक्षणसेवक जमीर तांबोळी,नीलम जाधव, किरण शिंदे यांची भाषणे झाली. (Old pension)

मोर्चाच्यावतीने  विविध मागण्यांच्या निवेदन दिले. शिक्षण सेवक पद रद्द व्हावे,  एक नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना मार्च २०२१ नंतर डीसीपीएस योजनेतील व्याज व अनुदान मिळावे,  एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जाहिरात व अधिसूचना नियमाचा लाभ व्हावा, १५ मार्च चा संच मान्यतेचा शासन आदेश रद्द व्हावा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुरुस्त व्हावी. शिक्षकांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू व्हावा, अनुकंपा शिक्षकांसाठी टीईटी ची अट रद्द व्हावी, खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांना स्थगित केलेला अर्जीत रोखीकरणाचा लाभ मिळावा, पगार नियमित वेळेवर व्हावेत या मागण्यांचा समावेश होता. (Old pension)

या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाचे एस डी लाड,भरत रसाळे, शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख राजमोहन पाटील, शिक्षक संघ थोरात गटाचे रविकुमार पाटील, पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष एस के पाटील, शिक्षक भारती चे गजानन  कांबळे, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, शिक्षक समितीचे अर्जुन पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, अर्जुन पाटील, पद्मजा मेढे ,शिवाजी रोडे- पाटील,गजानन कांबळे शिक्षक संघाचे प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे, शिक्षक समितीचे प्रभाकर कमळकर, राजेंद्र पाटील, राजीव परीट, बाजीराव पाटील, गणपती मांडवकर, सुरेश कोळी,  सुकुमार मानकर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, उपाध्यक्ष विजय कांबळे, राहुल तारळेकर, प्राथमिक शिक्षक महासंघाचे सदानंद शिंदे, शिक्षक सेनेचे एम. एन. पाटील ,शिक्षक भारतीचे अमर खोत, तुकाराम चौगुले, नाना कांबळे, पीराप्पा कागले, शहर जुनी पेंशन चे किरण पाडळकर, मयूर जाधव आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चाचे सूत्रसंचालन संघटनेचे कोषाध्यक्ष निलेश कारंडे, स्वागत प्रवक्ते प्रमोद पाटील तर आभार राधानगरी  तालुकाध्यक्ष मारुती पोवार यांनी मानले. (Old pension)

हेही वाचा :

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00