Home » Blog » nuclear power: अणुऊर्जेतून शाश्वत ऊर्जा विकास

nuclear power: अणुऊर्जेतून शाश्वत ऊर्जा विकास

पंतप्रधान मोदी यांनी भूमिका केली स्पष्ट

by प्रतिनिधी
0 comments
nuclear power

नवी दिल्ली : अणुऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जा विकासाकडे जाण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (३१ मार्च) भूमिका स्पष्ट केली. (nuclear power)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अणुऊर्जेद्वारे शाश्वत विकास आणि ऊर्जा क्षेत्रात स्वावलंब होण्यासंदर्भात भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिका वृत्तपत्रात मांडली आहे. या लेखाचे मोदी यांनी कौतुक केले.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने एका अमेरिकन कंपनीला भारतात अणुभट्ट्या बांधण्यासाठी आणि डिझाइन करण्यासाठी परवानगी दिल्याच्या वृत्तांदरम्यान पंतप्रधानांनी हे भाष्य केले आहे. (nuclear power)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे पंतप्रधानांचे जवळचे सहकारी आहेत. सिंह यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, भारताच्या शाश्वत आणि स्वावलंबी ऊर्जा कार्यक्रमात अणुऊर्जा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे.

भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. आयात केलेल्या जीवाश्म इंधनांवर देशाचे प्रचंड अवलंबित्व आहे. ते केवळ अर्थव्यवस्थेवर ताण आणत नाही तर जागतिक किमतीतील चढउतारांना बळी पडण्याची शक्यताही वाढवते. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय हवामान करारांवर स्वाक्षरी करणारा देश म्हणून, भारत कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी करण्यास वचनबद्ध आहे. सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या अखंड नवीकरणीय स्त्रोतांबरोबरच अणुऊर्जाही महत्त्वाची आहे. जलविद्युत केंद्रांनाही मर्यादा आहे. कोळसाआधारीत ऊर्जा निर्मितीमुळे गंभीर पर्यावरणीय आव्हाने निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा एक शाश्वत पर्याय प्रदान करते. (nuclear power)

डॉ. सिंग यांनी नमूद केले की आज भारताचे अणुऊर्जा क्षेत्र बदलले आहे. २०१३-१४ मध्ये अणुऊर्जा क्षमता केवळ ४,७८० मेगावॅट होती. ती ७० टक्क्यांहून वाढून ८,१८० मेगावॅटवर पोहोचली आहे. २४ अणुभट्ट्या सध्या कार्यरत आहेत. या प्रकल्पांमधून वार्षिक वीज निर्मिती २०१३-१४ मध्ये ३४,२२८ दशलक्ष युनिट्सवरून २०२३-२४ मध्ये ४७,९७१ दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढली आहे. सध्या अणुऊर्जेचा भारतातील वीज निर्मितीतील वाटा अंदाजे ३ टक्के वाटा आहे. अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर २१ अणुभट्ट्यांचा एकूण १५,३०० मेगावॅट क्षमतेसह हा आकडा लक्षणीयरीत्या वाढणार आहे. (nuclear power)
सरकारने २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या ती क्षमता ८.१८ गिगावॅट आहे. ती वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि विकसित भारतसाठी अणुऊर्जा अभियान सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून देशांतर्गत क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यासाठी रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य पुन्हा एकदा बळकट झाले आहे.

हेही वाचा :
शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे मोदी सरकारचे षड‌्यंत्र
६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00