Home » Blog » आता निकालाकडे लक्ष

आता निकालाकडे लक्ष

निकालाची उत्सुकता

by प्रतिनिधी
0 comments
Election file photo

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले आहेत.

बुधवारी मतदान झाल्यानंतर दहा मतदारसंघातील मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये मतदानयंत्रे आणली आहेत. त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी स्ट्राँगरुम उघडण्यात येणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सुरवातीला टपाली मतदान मोजण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र टेबल आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणीसाठी ठिकाणे निश्चित केली असून त्यासाठी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. फक्त कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघासाठी १६ टेबलची व्यवस्था केली आहे. ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी ६३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार आहे.

  • चंदगड : पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
  • राधानगरी : तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
  • कागल : जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
  • कोल्हापूर दक्षिण : व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी.
  • करवीर : शासकीय धान्य गोदाम क्र. डी, रमणमळा कसबा बावडा.
  • कोल्हापूर उत्तर : शासकीय धान्य गोदाम क्र. ए, रमणमळा कसबा बावडा.
  • शाहूवाडी : जुने शासकीय धान्य गोदाम, शाहूवाडी
  • हातकणंगले : शासकीय धान्य गोदाम- नंबर २, हातकणंगले.
  • इचलकरंजी : राजीव गांधी सांस्कृतिक भवन,  इचलकरंजी
  • शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00