26
मुंबई; प्रतिनिधी : राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज (दि.४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.सद्या गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत आहे. तसेच शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषिक करही रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. (Non-agricultural taxes)
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले अन्य महत्त्वाचे निर्णय
- कागल येथील सांगावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय
- शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
- टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीत टप्प्यास दिवंगत आ. अनिल बाबर यांचे नांव
- जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करणार
- आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
- महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ
- बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल
- कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव
- गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार
- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार, १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक
- उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा, अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
- राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
- बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
- सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
- वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
- डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
- इंदापूर येथे न्यायालये स्थापण्यास मान्यता
- बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
- महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार
- संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
- लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण
- कोकण पुणे विभागासाठी एसडीआरएफच्या दोन कंपन्या
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
- राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे
- पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता (Non-agricultural taxes)
- दौंड येथील बहूउद्देशीय सभागृह-नाटयगृहासाठी शासकीय जमीन
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मान्यता
- छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना
- प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद