पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवाच दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची चर्चा देशभर होत आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे दहा वर्षांत पृथ्वीचा नाश होईल, असा त्यांचा दावा. त्यांच्या या दाव्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. (Nitish-Tejaswi)
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय हवा भलतीच गरम झाली आहे. नितीशकुमार यांनी केलेल्या या दाव्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच नितीश कुमार यांनी नुकतेच विधानसभेत बोलताना, मोबाईल फोनच्या वापरामुळे १० वर्षांत पृथ्वीचा नाश होईल, असा दावा केला. (Nitish-Tejaswi)
त्यांच्या या दाव्यामुळे एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या विधानावर टीका केली. ‘‘नितीशकुमार हे रूढीवादी आणि तंत्रज्ञानविरोधी” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधिमंडळ अधिवेशनात मोबाईल वापरावर चिंत व्यक्त करण्यात आली. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे पुढील १० वर्षांत पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येईल, असा दावा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला. बिहार विधानसभा आवारातील मोबाईल फोनवरील बंदीबाबत चर्चा करताना त्यांनी हा दावा केला. या उपकरणांचा वापर असाच सुरू राहिला तर पुढील दशकात जग संपेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. (Nitish-Tejaswi)
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, कुमार कृष्ण मोहन उर्फ सुदय यादव यांना पीडीएस डीलर्सबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते मोबाइल फोन वापरत होते. हे लक्षात येताच, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. विधानसभेत मोबाईल फोनच्या वापरावर आधीच बंदी आहे, याची आठवण त्यांनी सभागृहाला करून दिली.
कठोर कारवाई करा
सभापती नंदकिशोर यादव यांच्याकडे नितीशकुमार यांनी आक्षेप नोंदवला. तसेच “सभागृहात मोबाइल फोनवर बंदी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जो कोणी, विधानसभेत मोबाइल फोन घेऊन येईल त्याला सभागृहाबाहेर हाकलून लावा,” असे ते म्हणाले.
मोबाईलचे परिणाम गंभीर मोबाईलचा अतिरेकी वापर केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देत त्यांनी आपलेच उदाहरण सभागृहात सांगितले. ते म्हणाले, “यापूर्वी, मी खूप मोबाइल वापरत होतो. मात्र माझ्या लक्षात आले की पुढे याचा त्रास होईल. त्यामुळे मी २०१९ मध्ये याचा अतिवापर थांबवला. मोबाईलचा अतिरेकी वापर सुरू राहिल्यास काही वर्षांतच जग संपेल.”
हेही वाचा :