कारवार : कारवार नौदल तळाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला लीक केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोघांना अटक केली. या दोघांनी हनी ट्रॅपिंगच्या कथित प्रकरणात अडकून ही माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हैदराबाद येथील एनआयएच्या पथकाने मंगळवारी मुदुगा गावातील वेताना तांडेल आणि हलवल्ली येथून अक्षय नाईक या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. (NIA nabs 2)
आरोपींना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी हनी ट्रॅपद्वारे अडकवल्याचा संशय तपासयंत्रणेला आहे. एका पाकिस्तानी महिला एजंटने २०२३ मध्ये फेसबुकवर त्यांच्याशी कथितपणे मैत्री केली आणि नौदलाच्या क्षेत्रातील हालचाली, युद्धनौकांचे तपशील, त्यांचे आगमन आणि निर्गमन आणि सुरक्षेची माहिती दिल्याचे तपासात उघड झाले आहे. (NIA nabs 2)
एनआयएने ऑगस्ट २०२४ मध्ये या संशयितांना हेरगिरीवरून तांडेल, नाईक आणि सुनील या तीन व्यक्तींची चौकशी केली होती. त्यांची चौकशी करून नंतर त्यांना सोडण्यात आले, मात्र त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते.
आरोपींनी पैशाच्या बदल्यात कारवार तळाची छायाचित्रे आणि नौदलाच्या हालचालींचे तपशील शेअर केले. त्या बदल्यात त्यांना आठ महिने दरमहा पाच हजार रुपये मिळत होते. एनआयएने २०२३ मध्ये हैदराबाद येथे दीपक आणि इतरांना अटक केल्यानंतर हेरगिरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. अधिकाऱ्यांनी आरोपींच्या हेरगिरी नेटवर्कशी संबंध जोडणारे आर्थिक व्यवहार शोधून काढले आहेत. तांडेल आणि नाईक हे कारवारच्या चांद्या भागातील आयर्न अँड मर्क्युरी या कंपनीत करारावर होते. सीबर्ड नेव्हल बेस कँटीनमध्ये माजी कंत्राटी कामगार असलेला सुनील आता ड्रायव्हर आहे. (NIA nabs 2)
एनआयए अटक केलेल्या व्यक्तींची चौकशी करत असून त्यांच्या हालचालींची माहिती मागवली आहे. सी बर्डच्या अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांना या प्रकरणात मोठे नेटवर्क असल्याचा संशय असल्याने आणखी अटक होण्याची शक्यता आहे. कारवार नौदल तळालाच ‘आयएनएस’ कदंब म्हणून किंवा प्रोजेक्ट सीबर्ड म्हणून ओळखले जाते. भारतीय नौदलाचे ते कर्नाटकातील महत्त्वाचे तळ आहे. हा भारतातील तिसरा सर्वांत मोठा नौदल तळ आहे. सध्या याचा विस्तार सुरू आहे. त्यानंतर तो पूर्व गोलार्धातील सर्वांत मोठा नौदल तळ असणार आहे.
हेही वाचा :
हिरोशिमापेक्षा पाचशे पट अधिक शक्तिशाली स्फोट होणार