Home » Blog » Naxals Killed: चकमकीत २२ नक्षलवादी ठार

Naxals Killed: चकमकीत २२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील दोन जिल्ह्यात कारवाई; जवान शहीद

by प्रतिनिधी
0 comments
Naxals Killed

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत किमान २२ माओवादी ठार झाले, तर गोळीबारात एक जवानही शहीद झाला आहे. (Naxals Killed)

बिजापूरमध्ये अठरा माओवादी ठार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या २० पर्यंत पोहोचू शकते. मृत जवान जिल्हा राखीव रक्षक दलाचा होता. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सुरक्षा दलांना बिजापूरच्या चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि स्फोटकांसह १८ मृतदेह सापडले. कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलातून चार मृतदेह सापडले आहेत.(Naxals Killed)

बस्तर पोलिसांनी सांगितले की, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात अजूनही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक बिजापूरच्या गंगलूर भागात माओवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी माओवाद्यांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले, असे पोलिसांनी सांगितले. सकाळी ७ वाजल्यापासून गोळीबार सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात माओवाद्यांच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या एका गटाला पकडले आहे. या चकमकीत किती जीवितहानी झाली याची माहिती संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.(Naxals Killed)

झिरो टॉलरन्स धोरण : गृहमंत्री अमित शहा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत २२ नक्षलवाद्यांना ठार मारल्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धोरणाचा पुनरुच्चार केला. नक्षलवादाविरोधात सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स धोरण’ कायम राहील असे त्यांनी सांगितले.

‘आज आपल्या सैनिकांना ‘नक्षल मुक्त भारत अभियान’ च्या दिशेने आणखी एक मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर येथे आपल्या सुरक्षा दलांने दोन ठिकाणी केलेल्या कारवायांत २२ नक्षलवादी मारले गेले,’ असे शाह यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.(Naxals Killed)

त्यांनी म्हटले आहे की, संधी असूनही आत्मसमर्पण करण्यास नकार देणाऱ्या नक्षलवादी बंडखोरांविरुद्ध मोदी सरकार कसलीही दयामाया ठेवणार नाही. पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी भारत ‘नक्षलमुक्त’ होईल, असा दावाही शहा यांनी केला.

बंदी असलेल्या सीपीआय (माओवादी) बंडखोरांना लक्ष्य करत गुरुवारी छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. विजापूर जिल्ह्यात १८ नक्षलवादी ठार झाले, तर कांकेरमध्ये चार नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. राज्य पोलिसांच्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.(Naxals Killed)

गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात सुरक्षा दलांनी नक्षलवादविरोधी कारवाई सुरू केली तेव्हा विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेजवळ पहाटे चकमक झाली. घटनास्थळावरून १८ मृतदेह, शस्त्रे आणि स्फोटकांसह जप्त करण्यात आल्याची पुष्टी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केली. या कारवाईत डीआरजी युनिटचा एक जवान शहीद झाला.

हेही वाचा :
दिशा सालियन मृत्यूप्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत

देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`


You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00