नागपूर : विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाचे आठजण कोतवाली पोलिसांत शरण आले. त्यानंतर त्यांना बुधवारी (१९ मार्च) जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, नागपूरच्या जुन्या शहरातील भालदारपुरा भागात बुधवारी संध्याकाळी कोम्बिंग ऑपरेशन सुरूच होते. (NAGPUR VIOLENCE)
दरम्यान, बुधवारी, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) नागपूर हिंसाचार प्रकरणातील १९ आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नागपूर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी रिमांडची मागणी केली.
पोलिस उपायुक्त झोन II चे राहुल मदने यांनी, सहाहून अधिक संशयितांची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांशी संबंधित अनेक निवासस्थाने देखील अधिकाऱ्यांनी शोधून काढली आहेत. या संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. गरज पडल्यास त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल. असे सांगण्यात आले.(NAGPUR VIOLENCE)
औरंगजेबाच्या थडग्याचा संरक्षित दर्जा रद्द करा : शिवसेना ठाकरे गट
शिवसेने (ठाकरे गट) ने बुधवारी केंद्र सरकारला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याचा संरक्षित स्मारक दर्जा रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे जातीय तणाव रोखण्यास मदत होईल, असा युक्तिवाद करत शिवसेनेने केंद्र सरकारला हे आवाहन केले आहे. उजव्या विचारसरणीच्या निदर्शनांनंतर नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वारसा बाजूला सारत राजकीय फायद्यासाठी भाजप आणि आरएसएस औरंगजेबासारख्या मुद्द्याचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रात केला.(NAGPUR VIOLENCE)
संघ हिंसाचाराचे समर्थन करत नाही : आंबेकर
संघाचे राष्ट्रीय प्रचार प्रभारी (अखिल भारतीय प्रचार प्रमुख) सुनील आंबेकर यांनी नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना म्हटले आहे की, “औरंगजेबाचा मुद्दा सध्या प्रासंगिक नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.”
महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेब कबर वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर त्यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली.(NAGPUR VIOLENCE)
संघाच्या आगामी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (अखिल भारतीय प्रतिनिधी सभे) पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेकर बोलत होते. ही सभा बेंगळुरूमध्ये होणार आहे.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`