बैरूत : लेबनॉनी गट ‘हिजबुल्लाह’चा प्रमुख नईम कासिम याने इस्रायलविरुद्ध मोठा विजय मिळवल्याचे म्हटले आहे. एका टीव्हीवरील भाषणात, कासिमने लेबनॉनमधील युद्धात इस्रायलला झुकण्यास आम्ही भाग पाडल्याचा दावा केला आहे. कासिम म्हणाला की, ‘हिजबुल्लाह’च्या सततच्या प्रतिकारामुळे इस्रायलला गुडघे टेकण्यास आणि तडजोड करण्यास भाग पाडले.
कासिमने सप्टेंबरमधील पेजर हल्ल्याचा संदर्भ देत कासिम म्हणाला की, इस्रायलला ‘हिजबुल्लाह’च्या कमांड सिस्टमवर हल्ला करून आपले लक्ष्य साध्य करण्याची आशा होती. मात्र, असे घडले नाही आणि हिजबुल्लाहने इस्रायलच्या होम फ्रंटवर हल्ले सुरू केले. इस्रायलला बचावात्मक स्थितीत ठेवले आणि युद्धविराम झाला. दरम्यान कासिमने सांगितले की, आम्ही आमची मान ताठ ठेवत हा करार केला आहे. लितानी नदीच्या खाली दक्षिण लेबनॉनच्या सर्व भागांतून इस्रायली सैन्याची माघार हा या कराराचा मुख्य मुद्दा होता. आम्ही त्यास चिकटून राहिलो आणि इस्रायलला ते मान्य करावे लागले. त्यांनी ‘हिजबुल्लाह’ कमकुवत होईल अशी व्यवस्था लावली होती; पण त्यांचा डाव पूर्णपणे फसला आहे.
कासिमने आपल्या भाषणात म्हटले की, आमचा हा २००६ पेक्षाही मोठा विजय आहे. युद्धविराम व्यवस्थेवर चर्चा करताना, कासेम म्हणाला की, कराराची अंमलबजावणी करण्यासाठी लेबनीज सैन्य आणि ‘हिजबुल्लाह’ यांच्यात उच्चस्तरीय समन्वय असेल. या काळात सतत लढत राहिल्याबद्दल कासिमने हिजबुल्लाचे कौतुक केले आहे.
औट घटकेचा युद्धविराम
इस्रायल आणि ‘हिजबुल्लाह’ यांच्यात या आठवड्यात युद्धविराम करार झाला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार इस्त्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतील आणि ‘हिजबुल्लाह’ही तेथून माघार घेईल. इस्रायल आणि ‘हिजबुल्लाह’मध्ये गेल्या १३ महिन्यांपासून वाद सुरू आहेत. हा तणाव गेल्या दोन महिन्यांत वाढला, जेव्हा इस्रायलने लेबनॉनवर बॉम्ब हल्ला सुरू केला. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. युद्धविरामानंतर पुन्हा संघर्ष सुरू झा