Home » Blog » Murder : पाच लाखाच्या दागिन्यांसाठी आजीचा खून

Murder : पाच लाखाच्या दागिन्यांसाठी आजीचा खून

कोल्हापूर जिल्ह्यातील घटना; नातवाला अटक

by प्रतिनिधी
0 comments
Murder

कोल्हापूर : प्रतिनिधी : आजीचा गळा आवळून डोके आपटून खून करुन नातवाने साडेचार तोळ्याच्या पाटल्या आणि पाऊण तोळ्याची माळ चोरुन नेणाऱ्या नातवाला पोलिसांनी अटक केली. गणेश चौगुले (वय २८ रा. विक्रमनगर गल्ली, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. (Murder)

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील भोई गल्लीतील सगुना तुकाराम जाधव (वय ८०) यांचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता उघडकीस आली. सगुना यांना तीन मुले आहेत. एक मुलगा गावातील नाडगोंडे गल्लीत तर दुसरा मुलगा शेतावरील घरात रहात होता. तर तिसरा मुलगा पुण्यात राहतो. तर सगुना या भोई गल्लीत रहात होत्या. (Murder)

त्यांचा मुलगा पुंडलिक जाधव यांच्या पत्नी सुनंदा या नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सासू सगुना यांना जेवण घेऊन भोई गल्लीत घरात गेल्या. पण घराला कुलुप होते. त्यांनी सासुबाईना हाका मारल्या, शोधाशोध केली पण त्या मिळून आल्या नाहीत. त्यांनी पतीला ही गोष्ट कळवल्यावर पुंडलिक जाधव भोई गल्लीत आले. त्यांनी घराचे कुलूप तोडले. आत पाहिले असता आई मृतावस्थेत आढळली. त्यांच्या बांगड्या फुटलेल्या होत्या तर हात आणि गळ्यातील दागिने गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Murder)

मुरगूड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला. सगुना यांच्या मुलीचा मुलगा गणेश चौगुले या घरात येत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इचलकरंजीतून गणेशला ताब्यात घेतले आणि अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा उलगडा केला. नातू गणेश चौगुले (वय २८ रा. विक्रमनगर गल्ली, इचलकरंजी) याने खुनाची कबुली दिली.

कर्ज फेडण्यासाठी आजीकडे मागितले एक लाख रुपये

गणेश चौगुले हा कर्जबाजारी आहे. त्याने कर्ज फेडण्यासाठी राहते घरही विकले आहे. आजीच्या नावे बँकेत दोन लाख रुपये होते. तो आजीकडे एक लाख रुपये कर्जफेडीसाठी मागत होता. पण आजीने नकार दिल्यावर त्याने मित्राच्या मदतीने गळा दाबून आजीचा खून केल्याचे कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी गणेशकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले हस्तगत केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. (Murder)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, राजीव शिंदे, अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने, प्रदीप पाटील, प्रशांत कांबळे, महेश खोत, रुपेश माने, राजू कांबळे, संदीप बेंद्रे, महादेव कुराडे, नामदेव यादव, सायबर पोलीस ठाण्यातील अतिश म्हेत्रे, विनायक बाबर यांच्या पथकाने तपास केला.

हेही वाचा :

‘पीएमएलए’ तरतुदींचा गैरवापर नको

 फ्रेशर्सचे कपडे काढले, दारू पाजली…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00