Home » Blog » Munde Dhas : मुंडे, धस भेटीचे गुपित काय?

Munde Dhas : मुंडे, धस भेटीचे गुपित काय?

चार तासांहून अधिक काळ बैठक

by प्रतिनिधी
0 comments
Munde Dhas

मुंबई : प्रतिनिधी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात चार तास बैठक झाली. मात्र या भेटीचे गुपित कायम राहिले. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीला आपण उपस्थित होतो, असे सांगितले. तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मुंडेंना भेटायला गेलो होतो, असे धस यांनी सांगितले. पण भेटीत चार तास चर्चा झाली याचा त्यांनी इन्कार केला. त्यामुळे मुंडे आणि धस यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Munde Dhas)

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी दोषींवर कारवाई होण्यासाठी गेले दोन महिने रान पेटवले. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असल्याने मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. आमदार धस यांनी मुंडे यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. आमदार धस यांच्या टार्गेटवर मुंडे असताना धस यांनी मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.(Munde Dhas)

भेटीबाबत बावनकुळे म्हणाले, आमची तिघांची भेट झाली. साडेचार तास ही भेट झाली. मुंडे यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटलो. मुंडे आणि धस यांच्यात मतभेद असतील पण मनभेद नाहीत. मी पक्षाचा अध्यक्ष असून आमच्या सोबत ही भेट झाली. ही भेट केवळ कौटुंबिक भेट होती. त्यामुळे भेटीचा वेगळा अर्थ काढू नये.(Munde Dhas)

भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, मुंडेंचे डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर त्यांना मी भेटलो. मी कुठेही लपून छपून भेट घेतलेली नाही. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. आम्ही चार तास भेटलो हे तुम्हाला कुणी सांगितले?, बावनकुळे यांनी सांगितले असेल तर त्यांनाच जाऊन विचारा. तसेच यापुढेही मी मुंडेंची प्रकरणे बाहेर काढणार आहे. तुम्हाला दोन तीन दिवसात कळेल असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा :

आरोप सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडेंना अभय!
मोदींनी ‘उद्योगपती मित्रां’कडून मणिपुरात गुंतवणूक आणावी
राजकीय पक्ष ‘आरटीआय’खाली…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00