मुंबई : प्रतिनिधी : टाटा आयपीएल २०२५ या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. सोमवारी घरच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून पराभव केला. (Mumbai won)
मुंबईच्या विजयात रिकल्टन आणि अश्वनी कुमार यांचा मोलाचा वाटा होता. रिकल्टनने ४१ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तर मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या अश्विन कुमारने चार गडी बाद करत आयपीएलमध्ये झकास सुरुवात केली. नाणेफेक जिंकून मुंबईने कोलकाताला फलंदाजी पाचारण केले. कोलकाताला मुंबईने ११६ धावांवर रोखले . त्यानंतर मुंबईने १२.५ षटकात कोलकाताची धावसंख्या सहज पार केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी ४१ धावांची भागीदारी केली.(Mumbai won)
रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला रिकल्टनने कोलकत्त्याच्या गोलंदाजाला तोंड देत वेगवान फटके मारले. मुंबईची धावसंख्या ९१ असताना जॅक्स १६ धावांवर बाद झाला. त्याला अॅंद्रे रसेलने बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने नऊ चेंडूत २७ धावांची धुवाधार खेळी केली. रिकल्टन आणि सूर्यकुमारने मुंबईला विजय मिळवून दिला. रिकल्टनने ४१ चेंडूत ६२ धावा चोपल्या. मुंबईने पहिला विजय मिळवत टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाचा मुंबई इंडियन्स निर्णय फलदायी ठरला. मुंबईने कोलकोता नाईट रायडर्सला ११६ धावात रोखण्यात यश मिळाले. मुंबईचा गोलंदाज अश्वनी कुमार चांगलाच चमकला. त्याने कोलकोत्याचे चार खेळाडूंना तंबूत धाडले. (Mumbai won)
दरम्यान, मुंबईविरुद्ध मैदानात उतरलेल्या कोलकोताला पहिल्याच षटकात झटका बसला. ट्रेंट बोल्टने सुनील नरेनला क्लिन बोल्ड केले. नरेन भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर मैदानात अजिंक्य रहाणे उतरला. पण दीपक चहरने कोलकोत्याला दुसरा झटका दिला. फटकेबाज फलंदाज क्विंटन डिकॉकने त्याला बाद केले. डिकॉकने एक धाव केली. त्यानंतर अजिक्य रहाणे आणि अंगकृत रघुवंशी यांनी कोलकोत्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. (Mumbai won)
कर्णधार अजिंक्य रहाणेला अश्वनी कुमारने पहिला बळी मिळवताना त्याला ११ धावांवर बाद केले. अजिंक्यने सात चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारला. त्यानंतर मैदानात आलेला उपकर्णधार वेंकटेश अय्यरही (३) तंबूत परतला. दीपक चहरने त्याला बाद केले. पॉवरप्लेमध्ये कोलकोताने चार गडी गमावले. हार्दिक पंड्याने खेळपट्टीवर स्थिर होऊ पाहणाऱ्या अंगकृत रघुवंशीला बाद केले. त्याने १६ धावात २६ धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. कोलकोत्याला सहावा झटका अश्वनी कुमारने दिला. रिंकू सिंह नमन धीरकडे झेल देऊन परताला. रिंकूनने १४ चेंडूत १६ धावा करताना प्रत्येकी एक चौकार आणि षटकार मारला. अवघ्या ४५ धावांत कोलकोत्याचे निम्मा डाव गारद झाला. (Mumbai won)
मनिष पांडेचा अश्वनी कुमारने त्रिफळा उडवत कोलकोत्याचा सातवा गडी बाद केला. मनिषने १९ धावा केल्या. अश्वनी कुमार कोलकोत्यासमोर घातक गोलंदाज ठरत होता. त्याने कोलकोत्याचा हिटर आंद्रे रसेलची (५) बोल्ड उडवली. रमनदीप सिंगने चांगली फटकेबाजी केली. त्याने १२ चेंडूत २२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एक चौकार आणि दोन षटकार खेचले. त्याला मिचेल सँटननरने जाळ्यात ओढले. ९९ धावांवर कोलकोत्याचा नववा गडी बाद झाला. विग्नेश पुथुरने हर्षित राणाला बाद केला. त्याने चार धावा केल्या. २० षटकात कोलकोता ११६ धावाच जमवू शकला. अश्वनी कुमारने चार गडी बाद केले. दीपक चहरने दोन तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, विग्नेश पुथुर आणि मिचेंल सेंटरनरने प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा :
जोकोविचला हरवून मेन्सिक विजेता