Home » Blog » Mumbai High court : कोरटकरांवर अटकेची टांगती तलवार

Mumbai High court : कोरटकरांवर अटकेची टांगती तलवार

उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai High court

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांना आज उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. जामिनासाठी अर्ज करणाऱ्या कोरटकरांची सुनावणी आता सोमवारी (दि.२४) होणार आहे. त्यामुळे कोरटकरांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. पुढील तीन दिवसात कोरटकराला अटक करण्याचे आव्हान कोल्हापूर पोलिसांसमोर आहे. (Mumbai High court)

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोरटकर यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणी कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. अटक टाळण्यासाठी कोरटकरकडून प्रयत्न सुरू असताना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकर यांचा जामिन अर्ज फेटाळला होता. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी कोरटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Mumbai High court)

आज शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पण सरकारी वकीलांनी कोल्हापूर सत्र न्यायालयातील निकालाची प्रत मिळालेली नसल्याने सुनावणी तहकूब करावी अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर बचाव पक्षाकडून कोरटकर यांच्या अटकेला स्थगिती मिळाली अशी विनंती न्यायालयाकडे केली. पण न्यायालयाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे कोरटकर यांच्या अटकेची टांगती तलवार कायम राहिली. (Mumbai High court)

कोरटकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र् न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना ११ मार्च पर्यंत अंतरिम जामिन अर्ज मंजूर केला होता. या कालावधीत कोरटकर यांनी आपला मोबाईल कोल्हापूर पोलिसांना स्वाधीन केला होता. पण मोबाईलमधील सर्व मजकूर हटवून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापूरात सरकारी वकील विवेक शुक्ल, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी जोरदार युक्तीवाद करुन कोरटकर यांचा जामीन नामंजूर करावा असा जोरदार युक्तीवाद केला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. कोल्हापूर पोलिस गेले तीन दिवस नागपूरमध्ये कोरटकर याचा शोध घेत आहेत पण तो फरार आहे. पुढील तीन दिवसात कोरटकरला पोलिस अटक करणार का? याचे शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. (Mumbai High court)

हेही वाचा :  

मंत्री गोरेंवर आरोपी करणारी महिला अटकेत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00